कणकवलीकोकणक्राइममहाराष्ट्र

पत्नीवर अॅसिड फेकणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल

*🟥पत्नीवर अॅसिड फेकणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली, दि.०३*:-पत्नीच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकल्याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती पत्नीचे वास्तव्य तालुक्यातीलच एका गावात असून अॅसिडफेकीची घटना पिंपरी – पुणे येथे २७ जानेवारीला सकाळच्या सुमारास घडल्याचे ४५ वर्षीय पत्नीने कणकवली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार ५० वर्षीय पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पत्नीवर ओरोस जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.फिर्यादीनुसार, वरील दोघांचे लग्न २०१५ मध्ये झाले आहे. तत्पूर्वी या दोघांचेही याआधी लग्न झालेले आहे. दोघांनाही पहिल्या पती किंवा पत्नीपासून प्रत्येकी दोन मुलेही आहेत. लग्नानंतर पतीला दारुचे व्यसन लागले. तसेच तो पत्नीवर सातत्याने संशय घ्यायचा व त्याच कारणावरून शिविगाळ, मारहाण करायचा. यातील पतीची मुलगी पुणे येथे असून सदर पती – पत्नी तेथे २७ जानेवारीला गेले होते. तेथे दोघांमध्ये वाद सुरु झाला व पतीने पत्नीला मारहाण सुरु केली. पतीने कंबरेत लाथ मारून पत्नीला खाली पाडले. पत्नी उठण्याचा प्रयत्न करत असतानाच पतीने सोबत बाटलीमधून आणलेले अॅसिड तिच्या चेहऱ्यावर फेकले. यात पत्नीच्या चहऱ्याला, गळ्याला व अन्यत्र दुखापती झाल्या, असे फिर्यादीत म्हटले आहे.याचदिवशी रात्री ८ वा. सुमारास पत्नी एकटीच पुण्यातून येथील राहत्या गावी आली. तिने घडला प्रकार जिल्ह्यातीलच अन्य तालुक्यामध्ये राहणाऱ्या बहिणीला सांगितला. बहिणीने तिला आपल्या घरी बोलवले व वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर बनल्याने तिला कणकवली उपजिल्हा रुग्णालय व तेथून ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. कणकवली पोलिसांनी ओरोस येथे जाऊन पत्नीचा जबाब घेतला. तिच्या फिर्यादीनुसार पतीवर भा. दं. वि. कलम ४९८ अ, ३२६ अ, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या अटकेची कार्यवाही सायंकाळी उशिरानंतर सुरु होती. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ करीत आहेत.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!