क्राइमशासकीयसंपादकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

अक्कल आमची दारू तुमची; एक अवैध दारु भरलेलेली बलेनो गाडी पूण्यात सोडायचे पन्नास हजार..

▪️कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, नाशिक चे दर वेगवेगळे..

▪️राज्य उत्पादन शुल्क अधिकारी व पोलिसांच्या तपासणी नाक्यावरील कर्मचारी गब्बर..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 संपादकीय : सीताराम गावडे

🎴सावंतवाडी,दि.०६: आमची अक्कल, तुमची दारू, मिळेल बक्कळ पैसा! याच पद्धतीने गोव्यातील दारू सिंधुदुर्गात व महाराष्ट्राच्या इतरत्र जिल्ह्यात राजरोसपणे पोहोचून कोट्यावधी रुपयाची अमाप संपत्ती गोळा केली जाते. या संपत्तीच्या जीवावर अनैतिक धंदे करून समाजविघातक कृत्य केली जातात व महाराष्ट्र शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडविला जातो.

खरोखरच झोपी गेलेल्याला जागे करता येते. मात्र, झोपेचे सोंग घेणाऱ्यांना जागे कसे करणार हा यक्षप्रश्न आमच्या समोर उभा असतानाच परिस्थितीसमोर हार न मानता लढत राहायचे हे एकच तत्व उराशी बाळगून आम्ही हे युद्ध यापुढेही लढत राहणार आहोत.

गोव्यातून दारूची एक गाडी पुणे येथे घेऊन गेल्यावर त्या चालकाला ५० हजार रुपये मिळतात एका गाडीमागे ५० हजार रुपये मिळत असतील तर अशा आठवड्याला चार वेळा चार बलेनो गाडी भरून दारू घेऊन गेल्यास दोन लाख रुपये एक महिन्याची कमाई होते. म्हणजे एखाद्या आयटी क्षेत्रातील तज्ञ मुलांना सुद्धा कंपनी कडून एवढे मोठे पॅकेज मिळत नसेल, तसे पैसे या धंद्यात मिळत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात दारू पोहच  करण्याचे दर वेगवेगळे आहेत. कोल्हापूरमध्ये तोच दर ३० हजार रुपये, साताऱ्यामध्ये ५० हजार रुपये, सांगलीमध्ये ६० हजार रुपये अशा प्रकारचे वेगवेगळे दर ठरवून घेतलेले आहेत. म्हणून अवैध दारू पुरवठा करणारे दारू तस्कर अल्पावधीतच करोडो रुपयांचे मालक होत आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर हप्ता राज्य उत्पादन शुल्क व पोलिस अधिकाऱ्यांना मिळत असल्याने ‘तेरी भी चूप मेरी भी चुप’ अशा पद्धतीने हा धंदा राजरोसपणे सुरु आहे.

गेला महिन्यावर याविरुद्ध कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल आपल्यापरीने आवाज उठविण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये आम्ही ६० टक्के यशस्वी झालो तरी उरलेली ४० टक्के लढाई अद्यापही सुरू आहे. व ही दारू वाहतूक पोलिसांची तपासणी नाके भरारी पथक यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून राजरोसपणे सुरू आहे. अशा एखाद्मा पर्यटकाची ५० लाखाची गाडी व गाडीत दारू वीस हजाराची असे मिळून सत्तर लाखाची कारवाई दाखवायची हे पोलिसांचे कधीही न सुटलेलं कोडं आहे.

एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध मार्गाने वाहतूक करणारे जवळपास दीडशे ते दोनशे दारू तस्कर आहेत. तर सावंतवाडी तालुक्यात जवळपास साठ महाविद्यालयीन विद्यार्थी या दारूधंद्मात कार्यरत आहेत. ते गोव्याला जात असताना आपल्या मैत्रिणींनाहि सोबत घेऊन जाऊन मौजमजा करून नंतर येताना गाडी मधून दारू भरून आणतात. हे वास्तव आहे. मात्र, तपासणी नाक्यावरचे पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याने हे दारु तस्कर मस्तावले आहेत. ज्यावेळी तपासणी नाक्यावर अशा वाहनांवर कारवाई केली जाईल, त्याच वेळी होणारा अवैध मद्य पुरवठा बंद होईल, असे आमचे ठाम मत आहे. अन्यथा ही नाकी काय कामाची नाहीत. म्हणून ती बंद करून टाकावी, अशी आमची मागणी आहे.

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*♦न्यूज एडिटर : गुरुनाथ राऊळ*
*📱संपर्क : +919422686976*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!