कणकवलीराजकीयशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

कोसळलेल्या बॉक्सवेल ब्रिजचा भाग अखेर हटविण्यास सुरुवात..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.०४: शहरात एस एम हायस्कूल जवळील कोसळलेल्या बॉक्सवेल ब्रिज चा वरील भाग अखेर हटविण्यास सुरुवात करण्यात आली. याबाबत नगरपंचायत मध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत हा भाग हटवून याठिकाणी नवीन बॉक्सवेल करण्याबाबत प्रस्तावित असल्याचे महामार्ग ठेकेदार कंपनीकडून सांगण्यात आले होते. मात्र, त्याला आमदार नितेश राणे व नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी विरोध करून तेथे फ्लाय ओव्हर ब्रिज करण्याबाबत आग्रही मागणी केली होती. दरम्यान या ​बॉक्सवेल ब्रिजच्या वरील भाग हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. ज्या ठिकाणी बॉक्सेल ब्रिज कोसळला होता. त्या वरील बाजूचा सिमेंट कॉंक्रीट रस्ता ब्रेकर द्वारे तोडण्यात येत आहे. वरील काही भाग ब्रेकर दारे कट करण्यात आला असून, उर्वरित भाग लवकरच काढण्यात येणार आहे. सदर ​बॉक्सवेल ब्रिजच्या वरील भागात अनेक ठिकाणी उभ्या भेगा गेल्या असून, कोसळलेल्या ठिकाणाहून एस एम हायस्कूलच्या अंडरपास पर्यंतचा पूर्णच कॉंक्रीट रस्ता काढून त्याजागी नव्याने रस्ता करावा लागणार आहे.  नगरपंचायत मध्ये झालेल्या बैठकीत आताच्या ​बॉक्सवेल ब्रिज असलेल्या भागात फ्लाय ओव्हर ब्रिज साठी ​४० को​टींचा खर्च प्रस्तावित असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र अद्याप फ्लाय ओव्हर ब्रिजला मंजुरी नसल्याने ​बॉक्सवेल ब्रिज संपूर्ण भाग काढणार कि फक्त एस एम हायस्कूल पर्यंत भाग काढून काम उरकले जाणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*

*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*

*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..

*_🙋🏼‍♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*

*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!