पं.स.सभेला सा.बां., बीएसएनएल, कृषि, विजवितरण अधिकारी अनुपस्थित; सभापतींची नाराजी
▪️यापुढील सभेत खाते प्रमुखांना उपस्थित राहण्याच्या सक्त सूचना दयाव्यात; सभागृहात मागणी
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.०४: पंचायत समितीच्या सभेला सार्वजनिक बांधकाम, बीएसएनएल, कृषि, विजवितरण यांचे अधिकारी अनुपस्थित असल्याने सभागृहात सभापतींनी नाराजी व्यक्त केली. यापुढील सभेत खाते प्रमुखांना उपस्थित राहण्यासाठी सक्त सूचना देण्यात याव्यात अशी मागणी सभागृहात करण्यात आली. तालुक्यातील बोर्डवे, वागदे या गावांत लेप्टो पेशंट आढळुन आले असल्याने तालुक्यामध्ये रुग्णसंख्या वाढू नये याबाबत गावोगांवी सर्व्हे करुन आवश्यक उपाय योजना लवकरात लवकर करण्याची मागणी मिलींद मेस्त्री यांनी केली. लोरे येथील मोबाईल टॉवर मोठा गाजावाजा करुन पालकमंत्री तसेच सर्व लोकप्रतिनिधी यांचे उपस्थितीत लोकार्पित करण्यात आला. परंतु सदर टॉवरची रेंज अदयाप मिळत नाही. टॉवरला अदयापही विज कनेक्शन नाही तरी सदरचा कार्यक्रम घाई गडबडीमध्ये बीएसएनएलने का आयोजित केला ? तरी याबाबत सविस्तर खुलासा करण्याची मागणी मनोज रावराणे यांनी केली. राष्ट्रीय जीवन्नोन्नती अभियान मार्फत गावांत कुटुंबाचा सर्वे सुरु आहे. याबाबत सरपंच ग्रामसेवक यांना विश्वासात घेण्यात यावे अशी सुचना मिलींद मेस्त्री यांनी मांडली. पंचायत समिती कणकवलीचे सर्वशिक्षा अभियान व पाणीपुरवठा कार्यालयाकडे येणारा नियमित रस्ता हददीजवळ बांधकामाचे अतिक्रमणामुळे बंद झालेला आहे. तरी सदरचे बांधकाम तात्काळ काढून रस्ता मोकळा करण्याचा ठराव मिलींद मेस्त्री यांनी मांडला. फोंडा विभागामध्ये शौचालयाचे किती प्रस्ताव पेंडीग आहेत याबाबत सुजाता हळदिवे यांनी विचारणा केली. भात पिक नुकसान भरपाई अदयाप मिळाली नाही, तरी ती लवकरात लवकर मिळावी अशी मागणी मिलींद मेस्त्री यांनी केली. कनेडीबाजार ते कनेडी हॉस्पीटल पर्यतचा २ किमी रस्ता पुर्ण खराब झालेला असल्याने दुरुस्ती करण्याची मागणी मंगेश सावंत यांनी केली. पुरहानीमुळे तालुक्यातील ग्रामस्थांची घरे कोसळलेली असून तात्पुरत्यानिवाऱ्यात लोकं राहात आहेत. तरी कोसळलेल्या घरांना मंजुरी कधी मिळणार? अशी विचारणा मिलींद मेस्त्री यांनी केली. तालुक्यात एस.टी. नियमित सोडण्यात येतात का ? नसतील तर कारणे काय आहेत अशी विचारणा प्रकाश पारकर यांनी केली.वारंवार मागणी करुनही कासार्डे लोरे विभागामध्ये विजवितरण कडून कामे पुर्ण करण्यात येत नाहीत. सतत लाईट पुरवठा खंडीत होत असल्याने नागरीक हैराण झालेले आहेत. जीर्ण पोल अदयाप बदललेले नाहीत. पोल उभारण्यासाठी खड्डे मारण्यात आले असून त्यामध्ये जनावरे अडकून नुकसान होत आहे. तरी याबाबत सविस्तर अहवालाची मागणी प्रकाश पारकर यांनी केली. लोरे लघु तलाव ते वाघेरी मळयापर्यत कॅनॉलचे पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरु आहे. सदरचे काम कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे विभाग आंबडपाल यांचेमार्फत सुरु असून सदरचे काम डिसेंबरमध्ये पुर्ण होवून जानेवारीमध्ये शेतकऱ्यांना पाणी मिळणे अपेक्षीत आहे . त्यानुसार काम पुर्ण होण्यासाठी नियोजन करण्यात यावे असे मनोज रावराणे यांनी सभागृहात मांडले. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियांनातर्गत तालुक्यातील आरोग्य केंद्राची कामे करण्यात येत असुन सदरची कामे योग्य दर्जाची होत नसल्याने त्यावर जिल्हा परिषद अभियंता यांनी पर्यवेक्षण करण्याबाबत आदेश व्हावेत अशी मागण मनोज रावराणे यांनी केली. कोरोना साथरोगामुळे व शासनाच्या आदेशानुसार पंचायत समितीची सर्वसाधारण सभा ऑनलाईन होत असल्याने सदस्यांना आपले प्रश्न प्रभावीपणे मांडता येत नसल्याने सभापती यांनी दिलगीरी व्यक्त केली. तालुक्यात डेंग्यु, मलेरीया, लेप्टो इ. साथरोग पसरु नये याबाबत योग्य काळजी घेण्यात येत आहे. वैदयकिय सेवा तत्पर करण्यात येत असून आवश्यक उपाय योजना राबविण्यात येत आहेत. तरी लोकांनी त्याला योग्य प्रतिसाद दयावा, ताप आल्यास नियमित वैदयकिय तपासणी करावी असे आवाहन सभापती यांनी केले.शासनाच्या निर्देशानुसार झुम ऍपद्वारे ऑनलाईन सभाध्यक्ष तथा सभापती दिलीप तळेकर यांचे उपस्थीतीत घेण्यात आली. या सभेला बहुसंख्येने कणकवली पंचायत समिती सदस्य तसेच खातेप्रमुख अधिकारी व कर्मचारी यांनी भाग घेवून सक्रिय सहभाग घेतला.
*_🧰💡आयटीआय मध्ये प्रवेश मिळाला नाही कशाला निराश होताय???…निश्चिंत रहा..मुक्त विद्यापीठ आपणास तंत्र शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे🤩😍_*
*🧰डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन🧰*
_तंत्रशिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी_
💫आजच भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा!
*🏃🏻♂️प्रवेश सुरु*
*सावंतवाडी अभ्यास केंद्र संपर्क*
*_📱9422896699_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

