भाजपचे शिरोडा गावचे सरपंच मनोज उगवेकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साध्या पद्धतीने साजरा.
सामाजिक बांधिलकी जपत केला सॅनिटाईजर स्टॅण्ड वाटप चा अभिनव उपक्रम
प्रतिनिधी – अर्जुन मोर्जे
शिरोडा :२६- दरवर्षी वाढदिवसाचे औचित्य साधून नाविन्यपूर्ण उपक्रम करणारे शिरोडा गावचे सरपंच मनोज उगवेकर यांनी कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर सध्या शाळा सुरू होण्याच्या मार्गावर असल्याने सुरक्षिततेच्या गरजा लक्षात घेऊन आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत आपल्या माध्यमातून अ.वि.बावडेकर हायस्कूल शिरोडा सेंट फ्रान्सिस झेविअर स्कूल आजगाव शिरोडा,मच्छीमार सह. सोसायटी , शिरोडा केरवाड येथे मित्र मंडळ व कार्यकर्ते समवेत भेट देऊन सॅनिटायझर स्टॅण्ड देण्यात आले.
या कार्यक्रमावेळी अनुक्रमे सेंट फ्रांसिस झेविअर स्कूल चे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी वर्ग, ग्रामपंचायत सदस्य सौ. प्राची नाईक , सौ. समृद्धी धानजी ,माजी शिरोडा ग्रा.पंचायत सदस्य अमित गावडे , भाजप वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, भाजप शिरोडा अध्यक्ष श्रीकृष्ण धानजी, युवा अध्यक्ष सोमाकांत सावंत, पदाधिकारी श्री. प्रकाश रेगे , विद्याधर धानजी , चंद्रशेखर गोडकर ,जयानंद शिरोडकर , त्याच प्रमाणे अ.वि.बावडेकर हायस्कूल शिरोडा येथिल कार्यक्रम वेळी मुख्याध्यापक श्री. अजित सावंत सर , शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
मच्छीमार सह. सोसायटी शिरोडा केरवाडा येथे वरील मान्यवरासोबत मच्छीमार सोसायटी चे उपाध्यक्ष श्री. संजय उगवेकर यांच्या कडे सर्वाच्या उपस्थितीत सॅनिटाईजर स्टॅण्ड सुपूर्द करण्यात आला. कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित मान्यवर ,पदाधिकारी व मित्र मंडळ यांच्या कडून सरपंच श्री. मनोज उगवेकर याना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. सामाजिक बांधिलकी जपत पूर्वीही वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. मनोज उगवेकर यांनी स्वखर्चाने ग्राम स्वच्छता अभियान , विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप , दिव्यांगांना साहित्य वाटप , रक्तदान शिबिर , गरीब कुटुंबांना तसेच अनाथाश्रम येथे जीवनावश्यक साहित्य वाटप , महिलांना मोफत व्यवसाय प्रशिक्षण असे अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.