बांदा-दोडामार्ग रस्ता दुरुस्ती व्हावी ह्यासाठी भाजपने छेडले रास्ता रोखो आंदोलन

बांदा-दोडामार्ग रस्ता दुरुस्ती व्हावी ह्यासाठी भाजपने छेडले आंदोलन

बांदा,दि.०९:-
बांदा- दोडामार्ग रस्त्यावर खड्याचे सामररज्य पसरल्याने गणेश चतुर्थी पूर्वी किमान खड्डे बुजवावे यासाठी आज भाजपने रस्तारोको आंदोलन सुरू केले होते.
बांदा- दोडामार्ग रस्त्याची अक्षरशा चाळण झाली आहे.सदरचा रस्त्याचे डांबरीकरण करावे यासाठी गेल्यावर्षी रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते.मात्र प्रशासनाने याची अद्यापर्यंत दखल घेतली नसल्याने आज रास्तारोको आंदोलन करण्यात आले आहे.यावेळी प्रशासन तसेच आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात येत आहेत.जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत ऊठणार नाही गुन्हे दाखल झाले तरी चालेल अशी भुमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती.यावेळी नगराध्यक्ष संजू परब,जि.प.उपाध्यक्ष राजेद्रं म्हापसेकर,बांदा सरपंच अक्रम खान,जावेद खतिब,एकनाथ नाडकर्णी,गुरू सावंत,श्वेता कोरगावकर,मधु देसाई,चंद्रशेखर देसाई,डी.के.सावंत आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!