पोटापाण्यासाठी व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करताना सबुरीने घेण्याची नागरिकांची मागणी
पुन्हा एकदा स्टॉल हटाव मोहिमेमुळे सावंतवाडीत व्यापारी झाले आक्रमक
ब्युरो चीफ:-विशाल पित्रे
सावंतवाडी,दि.२०:- शहरात आज नगरपालिकेने अचानक स्टाँल हटाव मोहीम हाती घेतली असता काही काळ बाजारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.अचानक नगरपालिकेचे अधिकारी येऊन दिवाळी निमित्त लावलेले साहीत्याचे दुकान काढू लागले त्यावर त्वरित त्या व्यवसायिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली की माझ्या एकाच दुकानावर कारवाई का करताय???मला मुदत वाढ करुन मिळावी यासाठी सुद्धा मी अर्ज केला आहे तसेच दररोज चे नगरपालिकेचे भाडे सुद्धा भरतो मात्र आज कोणतीही कल्पना न देता किंवा नोटीस न देता अचानक दुकान काढण्याची कारवाई केल्याने स्थानिक तसेच व्यवसायिक आणि नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांच्यात वाद निर्माण झाला.
कोरोना काळात सर्वच व्यवसाय बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे आता कुठे हळूहळू सर्व सुरळीत होतय दिवाळी चा सणानिमित्त आकाशकंदील,रांगोळी सारख्या वस्तूचे दुकान लावून दुकानात काही युवक आपला रोजगार उपलब्ध करत आहेत.मात्र अचानक येऊन नगरपालिकेने अशी कारवाई करणे कितपत योग्य आहे कारवाई केल्याने त्या युवकांवर कठीण परिस्थिती उदभवेल ह्याचा विचार पालिका प्रशासनाने करणे गरजेचे आहे. ह्या आधी नगरपालिकेने अनाधिकृत स्टाँल हटाव मोहीम केल्याने वाद निर्माण झाला होता..
सावंतवाडीत स्टाँल हटाव,आठवडा बाजार ह्यावरुन आधीच वाद पेटला होता अशी कारवाई करुन नगरपालिका प्रशासन अनेकांचा रोजगार हिरावून घेण्याचे काम करत आहे असे मत आता सावंतवाडीवासियांच्या मनात निर्माण होत आहे. सावंतवाडी पालिका शहरात आजूबाजूला रस्त्यावर बाहेरचे व्यवसायिक येऊन दुकाने लावून आपले पोट भरुन जात आहेत, मात्र नगरपालिका त्यांच्यावर कारवाई करत नाही मात्र अनेक वर्षे स्थानिक लोक व्यवसाय करत आहे तो अनाधिकृत म्हणून कारवाई करतात हे चूकीचे आहे.
सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी स्वतः जाहीर केले होते की दिवाळी निमित्त कुठेही बसून व्यवसाय करावा असे म्हटले होते अजून दिवाळी संपली नाही ,तुळशीची लग्न झाली की दिवाळी संपते मग आधिच ही कारवाई का? प्रशासन अचानक कारवाई करते ते सुद्धा स्थानिक व्यवसायिकांवर हा कोणता न्याय आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बाहेर गावाहून येऊन व्यवसाय करतात ते केव्हाच नगरपालिकेला दिसत नाही मात्र स्थानिक एखादा व्यवसायिक अनाधिकृत दिसला की त्याचे सगळं सगळ उचलून कचरा गाडीत भरतात हे खेदजनक आहे.नगराध्यक्ष संजू परब यांनी त्वरित यासंदर्भात लक्ष घालून स्थानिकांना सहकार्य करायला हवे असे नागरिकांचे म्हणणे आहे. ज्या लोकांनी तुम्हाला अध्यक्ष बनवले त्याच लोकांना पालिका प्रशासन त्रास देतय..ह्याचा परिणाम आपल्याला पुढील काळात होऊ शकतो कारण सावंतवाडी ची जनता सूज्ञ आहे..