त्या युवकाचा काढलेला स्टाँल सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पुन्हा दिला उभारुन
स्टाँल हटवण्याचे आदेश कोणाचे?? ह्या प्रश्नावर नगरपालिकेचे अधिकारी झाले निरुत्तर
सावंतवाडी,दि.२४:- नगरपालिकेच्या वतीने काल कोणताही आदेश नसताना एका युवकाचा अचानक स्टाँल काढण्याचे काम कार्यालयीन वेळ संपल्यावर नगरपालिकेच्या कर्मचारी व अधिकारी यांनी केले.याबाबत मुख्याधिकाऱ्यांनी आपले आदेश नसल्याचे स्पष्ट केले मग एकच स्टाँल काढण्याचा आदेश कोणाचा असा प्रश्न उपस्थित करत याचा जाब विचारण्यासाठी सर्वपक्षीय नेते
व्यापारी नगरपालिकेत गेले त्यावेळी मुख्याधिकारी नसल्याचे दिसून आले यानंतर मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क केला असता ओरोसला मिटींग करीता गेलो असल्याचे सांगितले. सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी तसेच व्यापाऱ्यांनी मुख्याधिकारी व पालिकेचा निषेधार्थ ठिय्या आंदोलन केले.मात्र आंदोलन सुरु असताना नगराध्यक्ष संजू परब पालिकेत असताना सुद्धा आंदोलनकर्त्यांची खाली भेट घेण्यासाठी आले नाही त्याच्या शिष्टमंडळाने आपल्या कडे येऊन भेटावे असा निरोप पालिकेच्या अधिकारी सौ.शिरोडकर यांच्या मार्फत देण्यात आला.मात्र आंदोलनकर्त्यांनी नगराध्यक्षांची आम्हांला भेट घ्यायची असा पवित्रा घेतला.यानंतर कोणतेच ठोस उत्तर न मिळाल्याने अखेर सर्व आंदोलनकर्त्यांनी रवी जाधव या युवकाचे दुकान होते त्या ठिकाणी पुन्हा उभारुन दिले.जो पर्यत मुख्याधिकारी ठोस आपला निर्णय देत नाही तोपर्यत आमचा लढा सुरुच ठेवणार असा इशारा आंदोलन कर्त्यानी दिला आहे.