आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनी आधी माहिती घ्यावी नंतर टिका करा-देवेंद्र टेमकर
*सावंतवाडी,दि.०६:- शहरात अतिवृष्टीमुळे पाणी दुषीत होण्याची शक्यता असताना अतिवृष्टीनंतर शहरातील सार्वजनिक, खाजगी विहिरीत क्लोरीन लिक्वीड, साचलेल्या डबक्यात अँबिट टाकल गेल का ? याची माहिती आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घ्यावी, जर ह्या गोष्टी झाल्या असतील तर त्या नेमक्या कुठे झाल्यात याचीही माहिती जनतेला द्यावी. अतिवृष्टीमुळे शहरात आरोग्य समस्या निर्माण होऊ नये म्हणून राष्ट्रवादीचा माध्यमातून मुख्याधिकारी यांच लक्ष वेधल होत. त्यामुळे महिन्याभरापूर्वी केलेल्या कामाचे पुरावे दाखवत दिशाभूल करू नये. तर डास निर्मुलन फवारणी बंदीस्त ठिकाणी होते, खुल्या जागेत होत नाही अशी माहिती भेटी दरम्यान मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी आम्हाला दिली. त्यामुळे प्रशासनामध्येच सावळा गोंधळ असल्याच यातून स्पष्ट होत आहे.
याच बरोबर शहरात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांचा, जनावरांचा उपद्रव यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. याबाबत नगरषरिदेने कोणती उपाययोजना केली ? हे देखील त्यांनी जाहिर कराव. शहरात काही ठिकाणी मोठे खड्डे पडून पाणी साचल असून अपघात झाल्यास त्याची पालिका प्रशासन जबाबदारी घेणार का ? असा सवाल राष्ट्रवादी शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर यांनी उपस्थित केला. तर स्टंटबाजी करायची सवय आम्हाला नाही. स्टंटबाजी कोण करत हे सावंतवाडीच्या जनतेला ठाऊक आहे. त्यामुळे आरोग्य सभापतींनी शहरात फेरफटका मारावा, वस्तुस्थिती समोर येईल असा पलटवार टेमकर यांनी लगावला.

