सामाजिकसिंधुदुर्ग

वी फॉर यू संस्थेच्या “essential drop” उपक्रमाचा शुभारंभ

पशू-पक्षांच्या संगोपनाचे कार्य स्वतःच्या घरापासून सुरु करा -ऍड संकेत नेवगी

सावंतवाडी, दि.१४:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज वी फॉर यू संस्थेने essential drop या उपक्रमाचा सावंतवाडी येथे शुभारंभ केला. माजी नगराध्यक्ष व जिल्हाबार असोसिएशन चे माजी अध्यक्ष ऍड दिलीप नार्वेकर यांच्या हस्ते “Essential Drop” चा शुभारंभ करण्यात आला. वाढत्या उष्णतेमुळे पशू पक्षी मोठ्या प्रमाणावर मृत्यूमुखी पडताना दिसून येतात. अशा वेळी पक्षांसाठी सावंतवाडी येथे जागोजागी खाद्य आणि पाणी असलेले Feeders बसवण्यात आले. वी फॉर यू संस्थेचे कार्य खरोखरचं आदर्शवत आहे. असे उदगार ऍड दिलीप नार्वेकर यांनी काढले आणि कार्यक्रमास शुभेच्छा ही दिल्या. संविधानिक हक्कानं बद्दल जसे जागृक आहात तसेच कर्तव्यानंबद्दलही जागृक रहा, पशू-पक्षांचे संगोपन करणे हे आपले कर्तव्य आहे. सुरुवात आपल्या घरापासून करूया असे आव्हान We For You चे अध्यक्ष ऍड संकेत अभय नेवगी यांनी केले. ह्या प्रसंगी सौ. व श्री. दिलीप नार्वेकर, वी फॉर यू चे अध्यक्ष ऍड. संकेत नेवगी, उपाध्यक्ष संपदा तुळसकर ,सचिव ऍड श्री स्वप्नील कोलगावकर, सहसचिव अमेय महाजन, खजिनदार मिहीर मोंडकर, ऍड श्रध्दा राऊळ, ऍड सायली चव्हाण, ऍड दत्तप्रसाद नाटेकर, तन्वी चव्हाण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!