पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या आदेशानंतर सावंतवाडीत 55 वाहनधारकांवर कारवाई
वाहनधारक व जनतेच्या जीविताची काळजी घेणारे कर्तव्य दक्ष पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे.
सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील ,जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भोसले, यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी शहरात ठिक ठिकाणी वाहनधारकांवर कारवाईची मोहीम राबविण्यात आली यात अठरा हजार आठशे रुपये दंड वसुल करण्यात आला.
सावंतवाडी शहरात मोबाईलवर गाडी चालवताना मोबाईलवर संभाषण करणे, लायसन नसताना गाडी चालविणे, गाडीवर काळी काच लावणे ,हेल्मेट न वापरणे, गाडीला असा नाही ,अशा पंच्चावन वाहनधारकांविरुध्द कारवाई करून अठरा हजार आठशे रुपये दंड वसूल करण्यात आला.
जिल्ह्यात व प्रत्येक शहरात होणाऱ्या अपघातांचे प्रमाण बघता ही कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिले होते, हे आदेश देताना नागरिकांना त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी वाहनधारकांना आवाहन करावे व कारवाई करावी अशा सूचना पोलिस अधीक्षक यांनी सूचना दिल्या होत्या. सिंधुदुर्ग पोलीस दलाची सूत्रे राजेंद्र दाभाडे यांनी हाती घेतल्यानंतर प्रत्येक पोलिस ठाण्यात सुसूत्रता आली आहे .नागरिकांशी मिळतेजुळते घेऊन ,विश्वासात घेऊन ,कामे कामे करावीत अशा सूचना पोलीस अधीक्षकांनी प्रत्येक पोलीस ठाण्याला दिल्या आहेत. जिल्ह्यातील अवैध धंद्याना दाभाडे यांच्या काळात बऱ्याच प्रमाणात लगाम लागला आहे. सर्वांना बरोबर घेऊन काम करणारे अधिकारी म्हणून पोलीस अधीक्षक दाभाडे परिचित आहे.
वाहन धारकावर कारवाई साठी 𝑹.𝑻.𝑶.सज्ज आहे.तुमचं डिपार्टमेंटच काम करा.सावंतवाडी,कणकवली येथे २,४वर्षा पुर्वी घरफोडी झाल्या होत्या.जरा शोधा बघुया सापडतात का आरोपी?आणि क्लु (धागा)काय मीळतो बघा.
आणि एक माणुस वाट बघतोय तुमची.सिसवे साहेबांपासुन आपल्या पर्यत सगळे एस.पी.झाले अजुन माझी केस घेतलेली नाहि.
जरा पोलिसी कारवाई करा.
लोकांच्या तक्रारी घ्या.