१०८ रुग्णवाहिकेची अवस्था झालीय बिकट
आरोग्य प्रशासनाने लोकांच्या जीवाशी खेळण बंद कराव : देव्या सुर्याजी
सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर असलेली १०८ उपलब्ध नसून सध्यस्थितीत असणारी अॅम्ब्युलन्स ही कंडीशनमध्ये नाही आहे. अॅम्ब्युलन्सवर डॉक्टर उपलब्ध नाही आहेत. तर सिरिअस पेशंटवर तातडीनं उपचार होण आवश्यक असताना जिल्ह्यातील कोणत्याही १०८ वर डाॅक्टर
उपलब्ध नाही आहेत. सध्य स्थितीत जिल्ह्यात १२ अॅम्ब्युलन्स असून फक्त ओरोस, देवगड, कणकवली या तीन ठिकाणी व्हेंटिलेटर आहे. मात्र, १०८ ची अवस्था गंभीर असून सावंतवाडीतील १०८ चे ब्रेक फेल झाले होते. त्यामुळे पेशंटसह ड्रायव्हरच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. शहरातील पालिका कर्मचाऱ्याला देखील १०८ अभावी आपला जीव गमवावा लागला. अपघातात गंभीर असलेल्या या रुग्णाला अधिक उपचारासाठी दाखल करण गरजेच असताना १०८ ची ४ तास वाट पाहत बसाव लागल. त्यामुळे या रूग्णांला आपला जीव गमवावा लागला. आजही उपजिल्हा रुग्णालयातील १०८ ची परिस्थिती भीषण असून त्याची अवस्था पाहता वाटेतच अपघात होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनानं लोकांच्या जीवाशी खेळण बंद करून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला व्हेंटिलेटर असलेली अद्ययावत अॅम्ब्युलन्स डॉक्टर सह उपलब्ध करून द्यावी अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केली. ही परिस्थिती न सुधारल्यास होणाऱ्या कोणत्याही घटनेला संबंधित प्रशासन आणि BVG कंपनी जबाबदार राहील असा रोखठोक इशारा देखील दिलाय.