प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्याला पडलेल्या खड्डयात बसून छेडले आंदोलन
सावंतवाडी,१९:-इन्सुली उत्कर्ष युवक मंडळाचे माजी अध्यक्ष आणि गावातील युवा सामाजिक कार्यकर्ते स्वागत नाटेकर यांनी आज ग्रामस्थ आणि वाहनचालक यांच्या मदतीने झोपलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जागे केले इन्सुली-कुडवटेंब येथे चर्च समोर रस्त्यावर अनेक वर्षे खड्डे पडतात आणि अपघात होतात एवढे होऊनही संबंधित अधिकारी मात्र दुर्लक्ष करतात आणि त्याचा नाहक त्रास वाहनचालकांना सहन करावा लागतो सावंतवाडी पासुन इन्सुली पर्यंत प्रवास केल्यास असे कितीतरी अपघातास कारणीभूत ठरणारे खड्डे नजरेस पडतील, गेल्यावर्षी केलेला रस्ता जर एका पावसाळ्यात खराब होत असेल तर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार करताहेत तरी काय असा सवाल जनता करत आहे वाहनचालकांनी रस्ता कर मात्र भरायचा आणि खड्डेमय रस्त्यावरुन गाडी चालवायची ही परिस्थिती बदलण्यासाठी कोणितरी आवाज उठवायला हवा त्याचीच प्रचिती आज इन्सुली गावात जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर बघायला मिळाली गावातील युवा सामाजिक कार्यकर्ते स्वागत नाटेकर यांनी हा मुद्दा उचलून धरुन ग्रामस्थांच्या मदतीने आंदोलनाचा पवित्रा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना जागे करत जाब विचारला आणि जोपर्यंत रस्ता दुरुस्तीचे ठोस आश्र्वासन मिळत नाही तोपर्यंत खड्डयात बसुन राहणार पण आंदोलन बंद करणार नाही असा पवित्रा घेतला शेवटी संबंधित अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी जाऊन येत्या आठ दिवसात आपण रस्ता सुरळीत करतो असे आश्वासन दिले.या आंदोलनामुळे जवळपास दोन तास वाहतूक कोंडी झाली होती. या आंदोलनात स्वागत नाटेकर,माजी सरपंच तात्या वेंगुर्लेकर,नंदु पालव, नितीन राऊळ, नाना पेडणेकर,सत्यवान केरकर, ग्रामपंचायत सदस्य महेश धुरी,केतन वेंगुर्लेकर, गजानन गायतोंडे,बाबलो झाटये, रामचंद्र उर्फ पिंट्या नाईक,बाळा कापडोसकर,जयराम पालव,रवी परब,हरी तारी,प्रिया नाटेकर, महादेव पेडणेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते