राजकीयवैभववाडीशासकीयसिंधुदुर्ग

वैभववाडीत भाजपचा सा.बां. विभागाच्या विरोधात २६ रोजी ठिय्या आंदोलनाचा इशारा..

आ. नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडणार असल्याचे तालुकाध्यक्ष काझी यांचे तहसीलदार यांना निवेदन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.१८: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे तालुक्यातील जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित विभाग या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याने गुरुवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी भाजपा आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा वैभववाडी भाजपच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार रामदास झळके यांना तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी दिले आहे.

तालुक्यात तरेळे-गगनबावडा, फोंडा-उंबर्डे, भुईबावडा-जांभवडे, खारेपाटण-गगनबावडा हे चार प्रमुख रस्ते आहेत. परंतु हे चारही रस्ते वाहतुकीस अत्यंत धोकादायक बनले आहेत. या रस्त्याने पायी चालणेही मुश्कील झाले आहे. या मार्गावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावर वारंवार अपघातांची मालिका सुरू आहे. रस्त्याची डागडुजी करण्यात यावी यासाठी भाजपच्या वतीने लेखी पत्रव्यवहार यापूर्वी अनेकदा करण्यात आला आहे. परंतु याकडे संबंधित विभागाने जाणून बुजून दुर्लक्ष केले आहे. या विरोधात भाजपा नेते आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडणार आहे. दरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे निवेदनात म्हटले आहे.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!