वैभववाडीत भाजपा पदाधिकाऱ्यांकडून वीज बिलांची होळी; राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी
▪️वीज वितरण कार्यालयासमोर भाजपाचे आंदोलन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.२३: वीज ग्राहकांना आश्वासन देऊनही राज्य शासनाने वीज बिलात माफी दिलेली नाही. वीज मंत्र्यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. याचा निषेध म्हणून वैभववाडी भाजपच्या वतीने वीज वितरण कार्यालयासमोर सोमवारी वीज बिलांची होळी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
लॉकडाऊन काळात अनेक उद्योग व्यवसाय बंद असताना वीज ग्राहकांना भरमसाठ वीज बिले आकारण्यात आली आहेत. राज्यात वीज बिलात माफी मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. राज्य शासनाकडून वीज बिल कमी करून देण्याचे संकेत दिले जात असताना ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ग्राहकांना वीज बिल माफी दिली जाणार नाही असे स्पष्ट केले आहे. यामुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट आहे.
हा संताप तालुका भाजपच्या वतीने व्यक्त करण्यात आला. भाजपच्या वतीने येथील वीज वितरण कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करण्यात आली. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष नासीर काझी, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जिल्हा सरचिटणीस भालचंद्र साठे, माजी वीत्त व बांधकाम सभापती दिलीप रावराणे, भाजप युवा मोर्चा प्रमुख किशोर दळवी, नगरसेवक संजय सावंत, संतोष माईनकर, रज्जब रमदुल, अनंत फोंडके, प्रदीप नारकर, विलास पावसकर, दाजी पाटणकर, संजय काडगे, शरद नारकर, सुनील भोगले, राजन तांबे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री व त्यांचे मंत्री केवळ घोषणबाजी करतात. फुकटची आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करण्याचे काम होत आहेत. असा आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला.
त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री. सूर्यवंशी यांची भेट घेऊन तालुक्यातील वीज समस्या मांडल्या. वीज वितरणचे अधिकारी केवळ पाट्या टाकण्याचे काम करीत आहेत. लाईट चालू-बंद करणे व बिलांची जबरदस्ती वसुली करणे एवढेच काम हे अधिकारी करीत आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांच्या समस्या तशाच राहिल्या आहेत.
ऊर्जा मंत्री राऊत यांनी वीज ग्राहकांचे मेळावे घेतल्याचे सांगत आहेत. मात्र वैभववाडी मध्ये एकही ग्राहक मेळावा झाला नाही. राज्य शासनाने केलेल्या घोषणे प्रमाणे एकही उपक्रम येथील वीज वितरण कार्यालयाने राबविलेला नाही. तालुक्यात वीज ग्राहकांचे वॉट्सअप ग्रुप तयार करण्याबाबत शासनाने निर्देश दिले असताना तालुक्यात असा एकही ग्रुप झाला नाही. अशा परिस्थितीत अधिकारी काय काम करतात असा सवाल पदाधिकाऱ्यांनी केला. येथील अधिकारी कार्यालयावर हजरच राहत नसल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला.
२६ नोव्हेंबर रोजी आमदार नितेश राणे वैभववाडी येथे येत आहेत. वीज ग्राहकांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी उपस्थित रहावे. यावेळी वीज वितरणचे कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. असे यावेळी सांगण्यात आले आहे.
*💥धमाका ऑफर.. धमाका ऑफर.. धमाका ऑफर..💥*
_🔥राऊत आणि कंपनी, रोवस्त्र, राऊत क्लाँथ सेंटर दिवाळी साठी कपड्यावर घेऊन आले आहे! खास धमाका ऑफर……!💥_
*💥😍 दिवाळी धमाका ऑफर 😍💥*
*🔥राऊत क्लाँथ सेंटर*
_ड्रेस मटेरिअल, टाँप, जिन्स_
फक्त ₹ १९९ पासून ड्रेस मटेरियल उपलब्ध..
*🔥रोवस्त्र*
_टि-शर्ट, शर्ट, जिन्स, जाँगर्स आणि हुडीस_
५० टक्के आँफ..💰
*🔥राऊत आणि कंपनी*
_साडी, सुटींग, शर्टींग_
₹ ९९ पासून साड्या उपलब्ध;
२० टक्के पर्यत सुट..💰
🏃🏻♂️चला तर वेळ का घालवता? आज भेट द्या! आणि लाभ घ्या! दिवाळीच्या धमाका ऑफर्स चा..🏃🏻♀️
*🔮 आमचा पत्ता 🤷🏻♂️*
*_🏬 भाट बिल्डींग, सावंतवाडी_*
*_📱संपर्क : 9156992364_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

