नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदांचा उपभोग घेऊन त्या सहा जणांनी गद्दारी केली; भाजपा मंडळ अध्यक्ष नासीर काझी
▪️त्या सहा नगरसेवकांच्या सेनेत जाण्याने वैभववाडी शहर स्वच्छ झाल्याची काझी यांची प्रतिक्रिया..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.०९: ते सहा नगरसेवक गेल्यामुळे वैभववाडी शहर स्वच्छ झाले आहे. शहरवासीयांना अपेक्षीत होतं ते त्यांनी स्वतः केलं आहे. आमदार नितेश राणे यांनी चिखल माती तुडवत त्या गद्दारांना मागील निवडणुकीत निवडून काढलं होतं. प्रचारादरम्यान आ. नितेश राणे स्वतः महिनाभर थांबले होते. ते गल्लोगल्ली फिरले. त्या गद्दारांना नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदे दिली. आणि सत्ता उपभोगून त्या सहा जणांनी गद्दारी केली. त्यांचा जाहीर निषेध असल्याची प्रतिक्रिया वैभववाडी भाजपा मंडळ अध्यक्ष नासीर काझी यांनी दिली आहे.
वैभववाडी भाजपाचे सहा नगरसेवक शिवबंधनात अडकत आहेत. या पार्श्वभूमीवर नासीर काझी म्हणाले, होऊ घातलेल्या वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत १७ पैकी १७ जागा भाजपाचे नगरसेवक निवडून येतील. त्यांच्या जाण्याने पार्टी शुद्ध झाली आहे. जे विरोधक नगरपंचायत, नगरसेवकावर टिका करत होते. त्याच नगरसेवकांना सेनेने प्रवेश दिला आहे. हे कोणत्या नीतिमूल्यात बसतं. असा सवाल नासीर काझी यांनी केला आहे. त्यांच्या जाण्याने कोणताही परिणाम होणार नाही. वैभववाडी न.प. ची निवडणुक शतप्रतिशत भाजपा जिंकणारच असा विश्वास काझी यांनी व्यक्त केला.
_*🚗इन्शुरन्स काढायचा आहे.. “Don’t Worry”*_
*🌈आता आपल्या गाडीचा इन्शुरन्स काढा अगदी आपल्या खिशाला परवडेल अशा पैशात..🚗*
*🛵आमच्याकडे सर्व गाड्यांचे फुल इन्शुरन्स,थर्ड पार्टी इन्शुरन्स काढून मिळतील..*
*🚗तुमच्या खिशाला परवडतील अशा विविध रक्कमेच्या इन्शुरन्स पाँलिसी उपलब्ध..*
_*🤷🏻♂️ संपर्क : विशाल पित्रे, सावंतवाडी*_
_*📱मोबाईल : 9405475712*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

