भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपजिल्हा रुग्णालयात धडक..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.१८: उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना विविध समस्या भेडसावत आहेत. त्याबाबतची वस्तुस्थिती पाहण्यासाठी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात धडक दिली. यात नवजात बालक आणि माता असलेल्या वॉर्डामध्ये अस्वच्छता दिसून आली. तर रक्तपेढी असून देखील रुग्णांना बाहेरून रक्त आणण्यासाठी पाठवले जात असल्याचे उघड झाले. या प्रकारावरून भाजप कार्यकर्त्यांनी तेथील वैद्यकीय अधिकार्यांना धारेवर धरले आणि तातडीने उपाययोजना करण्यास बजावले. ठेकेदार नीट काम करत नसेल तर त्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी केली.
नगरसेवक शिशिर परुळेकर, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, युवा मोर्चाचे सरचिटणीस संदीप मेस्त्री यांच्यासह निखिल आचरेकर, स्वप्नील चिंदरकर, समर्थ राणे, विजय चिंदरकर, बाळा पाटील, प्रदीप ढवण आदींनी आज उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी डॉ.सतीश टाक व इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. भाजप पदाधिकार्यांच्या पाहणीवेळी रुग्णालयातील १५ क्रमांकाच्या वॉर्डात शौचालय तुंबलेल्या स्थितीत आढळली. सदरची वस्तुस्थिती पाहता संतप्त झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी जोपर्यंत बांधकाम अधिकारी येथे येत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही असा इशारा दिला. त्यानंतर कार्यकारी अभियंत्यांची संपर्क साधण्यात आला. उपकार्यकारी अभियंता श्रीमती के के प्रभू यांनी घटनास्थळी येत पाहणी केली व तातडीने सदर तुंबलेले शौचालय दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले. त्यावर केवळ दुरुस्ती नको तातडीने त्या वॉर्डातील महिला व नवजात बालकांना अन्य चांगल्या वॉर्डात शिफ्ट करा अशी मागणी भाजपा पदाधिकार्यांनी केली. तसेच जोपर्यंत सदर पाच लाखाचे काम व्यवस्थित होत नाही तोपर्यंत ठेकेदाराचे बिल अदा करू नये अशी मागणी करण्यात आली.
रुग्णालयाच्या समस्यांबाबत तातडीने रुग्ण कल्याण समितीची बैठक आयोजित करा व आमदार नीतेश राणे यांच्यापर्यंत सर्व विषय मांडा अशी मागणी अण्णा कोदे यांनी केली.बांधकाम विभागामार्फत झालेल्या हलगर्जीपणा बद्दल तुम्ही गेले सहा महिने गप्प का? का असा सवाल संदीप मेस्त्री यांनी केला. यापूर्वी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना सिटीस्कॅन व एमआरआय मोफत करून दिले जात होते. अत्यावश्यक व गरीब रुग्णांना याचा मोठा फायदा होत होता. मात्र गेले काही वर्षभर ही सेवा बंद आहे. ती तातडीने सुरू करण्याची मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने मागणी केली. त्यावर एनआरएचएम अंतर्गत येणारा निधी बंद झाल्याने ही सेवा बंद असल्याचे डॉ. सतीश टाक यांनी सांगितले. तसेच जिल्हा रुग्णालयाकडून परवानगी मिळाल्यावर ही सेवा सुरू करण्याची ग्वाही दिली. उपजिल्हा रूग्णालयात रक्तपेढी आहे. मात्र येथे रक्तसाठा नसतो. गोरगरीब रुग्णांना बाहेरून रक्त आणण्यास सांगितले जाते. या मुद्दयावरही भाजप पदाधिकारी आक्रमक झाले. यावेळी पुरेशा प्रमाणात रक्तपिशव्या ठेवल्या जातील अशी ग्वाही डॉ.टाक आणि डॉ.शिकलगार यांनी दिली.
*💥धमाका ऑफर.. धमाका ऑफर.. धमाका ऑफर..💥*
_🔥राऊत आणि कंपनी, रोवस्त्र, राऊत क्लाँथ सेंटर दिवाळी साठी कपड्यावर घेऊन आले आहे! खास धमाका ऑफर……!💥_
*💥😍 दिवाळी धमाका ऑफर 😍💥*
*🔥राऊत क्लाँथ सेंटर*
_ड्रेस मटेरिअल, टाँप, जिन्स_
फक्त ₹ १९९ पासून ड्रेस मटेरियल उपलब्ध..
*🔥रोवस्त्र*
_टि-शर्ट, शर्ट, जिन्स, जाँगर्स आणि हुडीस_
५० टक्के आँफ..💰
*🔥राऊत आणि कंपनी*
_साडी, सुटींग, शर्टींग_
₹ ९९ पासून साड्या उपलब्ध;
२० टक्के पर्यत सुट..💰
🏃🏻♂️चला तर वेळ का घालवता? आज भेट द्या! आणि लाभ घ्या! दिवाळीच्या धमाका ऑफर्स चा..🏃🏻♀️
*🔮 आमचा पत्ता 🤷🏻♂️*
*_🏬 भाट बिल्डींग, सावंतवाडी_*
*_📱संपर्क : 9156992364_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_