कणकवलीत भाजपा वतीने एस.टी. कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लक्षवेधी आंदोलन..

▪️ठाकरे सरकार वेळेत पगार देत नसल्याने एस.टी. कामगारांवर आत्महत्येची वेळ आल्याची जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची टीका..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.१०: ठाकरे सरकार एस.टी. कर्मचाऱ्यांना वेळेत पगार देत नाही. कामगारांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे. एस.टी. कामगार आत्महत्या करू लागले आहेत. या घटनेचे आज कणकवलीत पडसाद उमटलेत. भारतीय जनता पार्टी कणकवली तालुक्याच्या वतीने एस.टी. कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लक्षवेधी आंदोलन लरण्यात आले. सरकार विरुद्ध घोषणा देत कामगारांना पगार देत नसलेल्या सरकारचा निषेध करण्यात आला. एस.टी. कामगारांवर आत्महत्या करण्याची वेळ आली. हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे. अशी टिक भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली.

हे आंदोलन कणकवली एस.टी. डेपोत करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली. कणकवली तालुका अध्यक्ष संतोष कानडे, सोनू सावंत, महेश गुरव, मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री, पपू पुजारे,विजय चिंदरकर, बाळा सावंत, आप्पा सावंत, दिलीप तिर्लोटकर तसेच भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

राज्य परिवहन महामंडळाचे सर्व कर्मचारी ग्रामीण भागातील जनतेला अतिशय चांगली सेवा देत असून त्यांना कामचा मोबदला वेळेवर न मिळाल्यामुळे राज्यात कर्मचाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे व तसे घडत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून एस.टी. कर्मचाऱ्यांचे वेतन दिले गेले नसल्याने अनेक ठिकाणी आत्महत्या केल्याच्या धक्करादायक घटना घडत आहेत. या राज्य सरकारच्या नाकर्तेपणामूळे व आघाडी सरकारच्या बिघाडी कामामूळे कर्मचाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ या सरकारने आणली आहे. लॉकडाऊन काळामध्ये कर्मचाऱ्यांना सांभाळणे हे कुटुंबप्रमुख म्हणून राज्य सरकारचे कर्तव्य आहे . हे कर्तव्य पार पाडण्यात सरकार पूर्ण अयशस्वी झालेले आहे. कर्मचाऱ्यांच्या या सर्व भावनांचा भारतीय जनता पार्टी कणकवली आदर करून त्यांच्या पूर्ण पाठीशी आहे . आणि आघाडी सरकारने कर्मचाऱ्यांचे वेतन व त्यांच्या गरजा भागवण्यास विलंब केला तर भारतीय जनता पार्टी अधिक तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा भाजपाच्या वतीने सरकारला दिला आहे. त्याचे निवेदन तालुका अध्यक्ष संतोष कानडे यांनी दिले.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!