आपत्कालीनकणकवलीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

कणकवलीत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात नऊ वर्षीय मुलगा जखमी; शहरात खळबळ

▪️भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणार असल्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे आश्वासन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.१६: शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव सुरू असून रविवारी रात्री ​९ वाजण्याच्या सुमारास कांबळेगल्ली येथील एका मुलाच्या हाताचा व तोंडाचा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने खळबळ उडाली आहे. हात रक्ताळलेल्या अवस्थेत जखमी मुलाला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे कणकवलीत भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत कणकवली न.प.चे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी या प्रश्नाबाबत जातीनिशी लक्ष घालणार असल्याची ग्वाही दिली आहे.

शहरातील भालचंद्र महाराज संस्थांच्या प्रवेशद्वारावर कुत्र्यांचा या परिसरात मोठा वावर असतो. या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या व्यक्तींना कायमच कुत्र्यांपासून धोका असल्याच्या तक्रारी होत होत्या. प्राणी मित्रांच्या रेट्यामुळे उपाययोजना बाबत कानाडोळा केला जात होता. रविवार रात्री ​९ वा​जण्याच्या सुमारास या रस्त्यावरून जाणाऱ्या ​९ वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्यांनी थेट हल्ला चढवत त्याच्या हाताचा चावा घेतला. त्यानंतर याठिकाणी जमलेल्या नागरिकांनी कुत्र्याला हुसकावून लावत त्या मुलाची सुटका केली. कुत्र्यांनी जखमी केलेल्या या मुलाला नागरिकांनी तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती समजताच नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी डॉक्टरांशी संवाद साधत त्या जखमी मुलाच्या प्रकृती विषयी माहिती घेतली. तसेच शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्या बाबत कोणत्या उपाय योजना करता येतील याची माहिती घेत या कुत्र्यांच्या बंदोबस्ताबाबत कार्यवाहीचे आश्वासन श्री. नलावडे यांनी दिले.

*_🎊 चला दिवाळी करु साजरी.. नवीन सायकल आणू दारी! 🚲_*

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

          🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈दिवाळी साठी सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!