मुक्ताई अॅकेडमीची 29 रोजी पहिलीच जिल्हास्तरीय ऑनलाईन बुदधिबळ स्पर्धा..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.16: शहरातील मुक्ताई कॅरम व बुदधिबळ कोचिंग अॅकेडमीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुदधिबळ प्रेमींसाठी कै.सौ. सरोज सुर्यकांत पेडणेकर स्मृती प्रित्यर्थ पहिल्या जिल्हास्तरीय ऑनलाईन ब्लिट्ज बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन केले आहे. कै.सौ. सरोज सुर्यकांत पेडणेकर यांच्या 81 व्या जयंती निमित्त जिल्ह्यात पहिल्यांदाच ऑनलाईन बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेचे प्रायोजक सुर्यकांत पेडणेकर असुन आंतरराष्ट्रीय आर्बिटर भरत चौगुले हे पंच आहेत. मुक्ताई अॅकेडमीचे आश्रयदाते राजघराण्यातील सावंतवाडी संस्थानचे युवराज श्रीमंत लखमराजे भोंसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धा रविवार दि.29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 05:30 वाजता ऑनलाईन घेण्यात येणार आहे. स्पर्धेत मुख्य गटात पाच पारितोषिके ठेवण्यात आली असुन विदयार्थी गटात दहा, पंधरा, एकोणीस वर्षांखालील वयोगटात प्रत्येकी दोन आणि विदयार्थिनी गटात तेरा, एकोणीस वर्षांखालील वयोगटात प्रत्येकी दोन अशी एकूण पंधरा रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. सहभागी स्पर्धकांना ई-सर्टिफिकेट देण्यात येणार आहेत.
स्पर्धेसाठी मुक्ताई अॅकेडमीच्या संचालिका सौ. स्नेहा पेडणेकर, टेक्निकल पार्टनर उत्कर्ष लोमटे आणि मिडीया पार्टनर एपीम मालवणी यांचे सहकार्य लाभले आहे. स्पर्धेसाठी नाव नोंदणी 8007382783 या क्रमांकावर शनिवार दि. 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 05:30 वाजेपर्यंत करावयाची आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच होणाऱ्या या ऑनलाईन बुदधिबळ स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आवाहन मुक्ताई अॅकेडमीचे संचालक कौस्तुभ पेडणेकर सरांनी केले आहे.
स्पर्धा ऑनलाईन असल्याने नाव नोंदणीसाठी कृपया संपर्कासाठी मोबाईल क्रमांक देण्यात यावा ही विनंती!
*_💥साजरी करा ही दिवाळी 🏮महाराष्ट्रातील नं.१ मोबाईल 🔥चैन SS ‘मोबाईल्स’च्या 🎊’दिवाळी ऑफर्स’ सोबत..🪔_*
*💫स्मार्टफोन खरेदीवर 40% पर्यंत सूट मिळवा*
*💫एक्सेसरीज खरेदीवर 80% पर्यंत सूट मिळवा*
*💫EMI सह स्मार्टफोन खरेदीवर रु.8000 पर्यंतचे कॅशबॅक 💵*
*💫भरा फक्त 99rs & get ur dream phone on loan💵*
*💫स्मार्टफोनवर चक्क! फीचर फोन $ फ्री*
*😍स्क्रॅच अँड वीन अंतर्गत रु. 2499 पर्यंत चे हमखास गिफ्ट 🎁*
*⚡पूर्व गिफ्ट मिळवा एका क्लिक वर👇🏻* http://ssoffers.online/rewards/SS-DIWALI-OFFER
*_🤷🏻♂️आजच SS मोबाइल स्टोअरला 🏬भेट द्या! आणि दिवाळीच्या जबरदस्त🔥ऑफर्स चा लाभ घ्या!🤷🏻♀️_*
*🌈शाखा : सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, रत्नागिरी, गोवा..*
*_📱Kankavali : 7030934427_*
*_📱Sawantwadi : 7066755656_*
*_📱Kudal : 8956931120_*
*_📱Ratnagiri : 8390455123_*
*_📱Chiplun : 8806779333_*
*_📱Head 0ffice : 8600666111_*
*🌐Buy online*
www.ssmobile.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

