कणकवलीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

कणकवली नगरपंचायत मधील रिक्त पदे भरण्यात यावी; समीर नलावडे

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.३०: येथील नगरपंचायतचा मंजुर असलेल्या स्टाफ पॅटर्न मधील रिक्त पदे भरण्याबाबत कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडु हर्णे यांच्यासह नगरसेवक व माजी नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत लक्ष वेधले. नगरपंचायतचे काही कर्मचारी सेवानिवृत्त झाले असुन, काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. मात्र या जागी नवीन कर्मचारी देण्यात आले नसल्याने, कणकवली शहरातील जनतेची प्रशासकीय कामे होण्यास विलंब होत आहे.

गतिमान प्रशासन कणकवलीकरांना मिळावे, त्यातुन जनतेची कामे जलद गतीने मार्गी लागावी. यासाठी नगरपंचायतीचा मंजुर स्टाफ पॅटर्नमधील रिक्त पदे भरण्याची गरज आहे. याबाबत आपल्या स्तरावरून कार्यवाही व्हावी, अशी मागणी नगराध्यक्ष नलावडे आणि उपनगराध्यक्ष हर्णे यांनी केली. तसेच जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या सभा ऑफलाइन पद्धतीने घेण्याबाबत शासन निर्णय झाला आहे. मात्र नगरपंचायतीच्या सभा ऑफलाइन घेण्याबाबत अद्याप आदेश प्राप्त नाहीत.

यामुळे अनेकदा नेटवर्कच्या समस्येमुळे जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी नगरसेवकांना योग्य संधी मिळत नाही. पर्यायाने जनतेची कामे ही रखडण्याची व विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगरपंचायतची सभा ही त्यात या प्रभागातील नगरसेवकांना समस्या मांडण्यासाठी संधी असते. शहरांच्या विकासासाठी नगरसेवकांना आपापल्या प्रभागातील प्रश्न या सर्वसाधारण सभेत मांडता येतात. मात्र सर्वसाधारण सभा पुर्वीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीने घेण्यास मान्यता नसल्याने याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करून तसे आदेश संबंधित प्रशासन यांना देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. याचबरोबर कणकवली मुख्याधिकारी पदी गेले काही महिने प्रभारी मुख्याधिकारी यांच्याकडे कार्यभार देण्यात आलेला आहे. हे मुख्याधिकारी पुर्णवेळ शहरासाठी देऊ शकत नसल्यामुळे शहरातील जनतेची अनेक कामे रखडत आहेत. प्रशासकीय कामकाज गतिमान होण्यासाठी कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळेपर्यंत तात्पुरत्या मुख्यधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा नगर विकास अधिकारी वैभव साबळे यांना कणकवली प्रभारी मुख्याधिकारी म्हणुन नियुक्ती देण्यात आल्याची जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी आरोग्य सभापती अभिजीत मुसळे, माजी नगरसेवक किशोर राणे उपस्थित होते.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!