कणकवलीराजकीयसिंधुदुर्ग

स्वत:ची क्षमता नसताना नारायण राणेंवर टीका करणाऱ्या संदेश पारकर यांनी सगळ्या सभ्यता गुंडाळल्या; समीर नलावडे

▪️गद्दारीचे दुसरे नाव म्हणजे संदेश पारकर हा संदेश आता पूर्ण जिल्ह्यात पोचला;  नलावडे यांची टीका

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴 कणकवली,दि.२८: स्वत:ची क्षमता नसताना नारायण राणेंवर टीका करणाऱ्या संदेश पारकर यांनी मात्र आपल्या सगळ्या सभ्यता गुंडाळून ठेवल्या. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंमुळेच संदेश पारकर यांना कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष पद मिळाले. त्यानंतर पारकर यांच्या नशिबी कोणतेच पद परत आले नाही. गद्दारीचे दुसरे नाव म्हणजे संदेश पारकर हा संदेश आता पूर्ण जिल्ह्यात पोचला असल्याची टीका भाजपचे समीर नलावडे यांनी केली आहे.

पारकर आता ज्या पक्षात आहेत, तेथे पारकर यांना साधे पक्षाचे घटनात्मक पदही दिलेली नाही. त्यावरून पारकर यांनी आपली कुवत ओळखावी व नंतरच नारायण राणेंवर टीका करावी. सत्ताधारी पक्षात असून सुद्धा गेले सहा महिने अंगरक्षकासाठी पारकर यांना झटावे लागते. पारकर यांना अंगरक्षकांची गरज काय हा प्रश्न न उलगडणारा आहे? अंगरक्षक घेऊन शायनिंगबाजी करण्यापुरतीच पारकर यांची मर्यादा आहे. सत्ता असून देखील शासकीय अंगरक्षक मिळत नाही. हि पारकर यांची राजकारणातील उतरती कळा आता त्यानी ओळखावी. नारायण राणेंवर टीका करून स्वतःचे अस्तित्व दाखवणाऱ्या पारकर यांनी राजकारणातील आपले निवृत्तीचे वय झाले हे ध्यानात घ्यावे. सुरुवातीला काँग्रेस, राष्ट्रवादी त्यानंतर पुन्हा काँग्रेस, नंतर भाजपा व आता शिवसेना एवढे पक्ष बदलूनही पारकर यांना फक्त नारायण राणे यांनीच पद दिले. राणेंनी साथ सोडल्यानंतर पारकरांच्या नशिबी पराभवच आले. त्यामुळे आपली कुवत ओळखून पारकर यांनी आपली जीभ चालवावी. नारायण राणेंवर टीका करून प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्या पारकर यांना कणकवलीकरांनी नाकारले. अशा कणकवलीतही अस्तित्वं नसणाऱ्या पारकर यांनी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांवर टीका करणे म्हणजे स्वतःची लाल करण्यातला प्रकार असल्याचे नलावडे यांनी म्हटले आहे.

नारायण राणेंकडून पद घेऊन कृतघ्न झालेल्या पारकर यांनी पदाच्या लालसेपोटी नारायण यांची साथ सोडली. पण त्यांची मर्यादा कणकवली पुरतीही राहिली नसल्याची जाणीव कणकवलीकरांनी निवडणुकीत करून दिली. त्यामुळेच पारकऱ यांना शिवसेनेकडून पण पद दिले जात नाही. कारण पारकर जास्त काळ कुठल्याच पक्षात राहत नाहीत. त्यामुळे शिवसेनेत ते किती काळ राहतील, याचा कुणालाच भरोसा नाही. नितेश राणे यांच्या नकाची हि सर घेऊ शकत नसलेल्या पारकर यांनी त्यांच्यावर आरोप करून आपण स्पर्धेत राहू पाहत आहेत. परंतु नितेश राणे यांचा मागील निवडणुकीतील विजय २८ हजार मताधिक्‍याने झाला. जे कणकवली शहर सांभाळू शकले नाहीत. त्यांनी विधानसभेत विजयी उमेदवारावर बोलावे यातूनच यांची वैचारिक दिवाळखोरी दिसून येते. दरवेळी पक्ष बदलायचे व आपल्याला स्वार्थासाठी आपल्या सोबत इतर कार्यकर्त्यांना दुसऱ्या पक्षाच्या दावणीला बांधायचे ही पारकर यांची वृत्ती ओळखल्या मुळेच ते राहत असलेल्या वार्डात ही त्यांचा कार्यकर्ता शिल्लक नाही. नारायण राणेंवर बोलले की आपल्याला राणे विरोधक म्हटले जाईल या भावनेतून पारकर यांची टीका सुरू असते. परंतु त्याच नारायण राणे यांचे पाय चटणाऱ्या पारकर यांनी आपली उरलीसुरली असलेली अब्रू वाचवण्यासाठी राजकीय संन्यास घेण्याची वेळ आता आली आहे. अन्यथा तेलही गेलं आणि तूपही गेलं अशी त्यांची परिस्थिती आल्याशिवाय राहणार नाही, असं नलावडे यांनी म्हटलंय.

*😍☺️🏠 बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते… हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!