जलजीवन मिशन अंतर्गत कुंभार्लीतील दोन पूर्वस मंदिर मळगांव परिसरात मंजूर विहिर खोदकामाचे भूमिपूजन संपन्न
सरपंच स्नेहल जामदार सोबत उपसरपंच हनुमंत पेडणेकर व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांची उपस्थिती
सावंतवाडी (सुखदेव राऊळ )
जलजीवन मिशन अंतर्गत दोन पूर्वस मंदिर परिसरात मंजूर झालेल्या विहिरीचे भूमिपूजन मळगांव सरपंच सौ. स्नेहल जामदार व उपसरपंच हनुमंत पेडणेकर यांच्यासहित ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले. केंद्र शासनाच्या निधीतून ही विहिर होणार आहे.
सदर विहिरीसाठी स्थानिक ग्रामस्थ जगन्नाथ राऊळ यांनी विनामोबदला जागा उपलब्ध करुन दिल्यामुळे गेली अनेक वर्षे भेडसावणारा मळगांव कुंभार्ली परिसरातील पाणीप्रश्न मार्गी लावणे सोयीस्कर होणार आहे. सरपंच व उपसरपंचासहित ग्रामस्थांनी जमीनदाते जगन्नाथ राऊळ यांचे आभार मानले असून कुंभार्ली व मळगांव रस्तावाडी परिसरातील अनेक वर्षातील पाणी टंचाई दूर होणार असून जगन्नाथ राऊळ यांच्यासारख्या सेवाभावी व्यक्ती गावात असतील तर गावाचा विकास होईल, असे गौरवोद्गार यावेळी सरपंच स्नेहल जामदार यांनी व्यक्त केले.
या भूमिपूजनावेळी मळगांव सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब,सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर,ग्रामपंचायत सदस्या निकिता राऊळ, अनुजा खडपकर, तुकाराम सावळ, आनंद देवळी , माजी ग्रामपंचायत सदस्य गजानन सातार्डेकर,गुरुनाथ गावकर, पुरोहित विजय जोशी,गावचे मानकरी सखाराम उर्फ काका गावकर,नीलेश राऊळ,शशिकांत राऊळ, पांडुरंग राऊळ, शिवराम राऊळ, बाबी राऊळ, राजन राऊळ,
विश्वनाथ गोसावी, सिद्धेश तेंडोलकर,अंतोन फर्नांडिस, मनोहर गावकर, उदय सावळ,राजन राऊळ, विजय जोशी भटजी,नीलकंठ बुगडे, रुपेश गवंडे, दत्तप्रसाद नाईक आदी उपस्थित होते.विहिरीचे भूमिपूजन सरपंच सौ. स्नेहल जामदार यांच्या हस्ते करण्यात आले.