कोकण लाईव्ह न्युज चॅनलच्या अग्रलेखाने राज्य उत्पादन शुल्क खाते हडबडले..

▪️सिंधुदुर्गात पाठवली उपायुक्तासह वीस जणांची टीम..

▪️राज्य उत्पादन शुल्क ची कारवाई म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी..

▪️अनधिकृत धंदेवाल्यांना पाठीशी घालण्यासाठी परमिट धारकांना त्रास देण्याचा प्रयत्न..

▪️गोव्यातून कोट्यावधी रुपयांच्या होणाऱ्या अवैध मद्य साठ्यावर कारवाई करायचे सोडून स्थानिक परमिट धारकांचे नाक दाबण्याचा प्रयत्न..

▪️सावंतवाडीत अधिकृत परमिट धारक रस्त्यावर..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 संपादकीय : सीताराम गावडे

🎴सावंतवाडी,दि.०६: राज्य उत्पादन शुल्क यांचे उपायुक्त वाय. एम. पवार व त्यांचे सहकारी अशा पाच गाड्या सिंधुदुर्गात दाखल झाल्या व अवैध मार्गाने दारू वाहतूक करणाऱ्यांना सोडून अधिकृत परमिट धारकांवर धाडी टाकून त्यांना त्रास देण्याचा प्रकार घडल्याने बार संघटना संतप्त झाली व ती रस्त्यावर उतरली. याबाबतचा हंगामा आज सावंतवाडीत पाहायला मिळाला.

कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल ने अवैध धंद्याविरोधात मोहीम उघडल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांना निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला होता. जप्त करण्यात आलेला अवैध मद्य साठा   तत्कालीन पंचनाम्यानुसारच आहे की नाही, याची शहानिशा त्रयस्थ पंच घेऊन करण्यात यावी अशी मागणी निवेदनात केली होती. व ती मागणी येत्या १५ दिवसात पूर्ण न झाल्यास आयुक्तांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता.

आज राज्याचे आयुक्त कांतीलाल उमाप यांच्या सूचनेनुसार उपायुक्त वाय. एम. पवार व त्यांचे सहकारी सिंधुदुर्गात दाखल झाले. सिंधुदुर्गात दाखल झाल्यावर शासनाचे परमिट धारक बार आहेत. त्या बार मध्ये तपासणी करून बार धारकांचा रोष त्यांनी आपल्यावर ओढवून घेतला. वास्तविक शासनाचे अधिकृत परमिट धारक राज्य उत्पादन शुल्क कधीही तपासू शकतात. त्याची आत्ताच घाई नव्हती. मात्र, अधिकृत परमिट धारक अवैध धंद्याविरोधात वृत्तपत्रांना, न्यूज चॅनल ला बातम्या देतात असा ग्रह करून घेऊन उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी त्यांनाच पहिले टार्गेट केले. काही बार चालकांची तपासणी केल्यावर त्यांना अनधिकृत असे काही आढळून आले नाही. मात्र, काही ठिकाणी गोवा बनावटीच्या रिकाम्या बाटल्या तर काही ठिकाणी जागेच्या नकाशात बदल अशी कारणे दाखवून गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, या गुन्ह्यांना बार संघटनेने प्रखर विरोध केला.

गोवा राज्यातून दिवसाकाठी करोडो रुपयांची होणारी वाहतूक पकडायची सोडून, त्यांच्यावर कारवाई करायची सोडून अधिकृत बारधारकांनाच त्रास देण्याचा प्रकार म्हणजे ‘भीक नको पण कुत्रं आवर’ असे म्हणण्याची वेळ राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी सिंधुदुर्गातील बार चालकांवर आणली आहे.

नाकाबंदी करून गोवा राज्यातून येणारा अवैध मद्याचा साठा जप्त करून मोठी कारवाई केली असती तर त्यांच्या धाडसाचे आम्ही निश्चितच कौतुक केले असते. मात्र, स्थानिक परमीट धारकांना घालविण्यासाठी वेगवेगळी कारणे दाखवून त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असेल तर त्याचे आम्ही समर्थन कधीही करणार नाही. मात्र, जो परमिट धारक महाराष्ट्र शासनाचे परमिट वापरून गोवा राज्याची दारू विकत असेल तर त्याच्यावर कारवाई होऊन त्याचा परवाना रद्द व्हायला पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. मात्र, नाक दाबून तोंड उघडण्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्काने करू नये, असे आमचे म्हणणे आहे.

गोवा राज्यातून येणारा अवैध मद्य साठा उपायुक्त व त्यांच्या सहकाऱ्यांनी जप्त  करून मोठी कारवाई करून दाखवावी, असे आमचे त्यांना आव्हान आहे. नुसते सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले व पर्यटन करून गेले, असे व्हायला नको. म्हणून अधिकृत बार चालकांना तपासणीच्या नावाखाली त्रास द्यायचा व अवैध मार्गाने वाहतूक करणाऱ्यांची  पाठराखण करायची हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे असे आम्हाला वाटते.

राज्याचे उपायुक्त वाय. एम. पवार यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता त्यांनी आयुक्तांच्या आदेशानुसार आपण सिंधुदुर्गातील अवैध धंद्याविरोधात कारवाई करणार आहोत. तसेच अवैध मद्य साठा जप्त करून तो ज्या ठिकाणी ठेवला आहे, त्याची शहानिशा केली जाईल असे स्पष्ट केले आहे. कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या उठावानंतर राज्याचे उत्पादन शुल्क अधिकारी खडबडून जागे झाले व आज सिंधुदुर्गात राज्य उत्पादन शुल्काच्या पाच गाड्या व वीस कर्मचारी दाखल झाले आहेत. आयुक्तांनी घेतलेल्या या गंभीर दखलीबद्दल आम्ही निश्चितच स्वागत करतो. मात्र, ही कारवाई तात्पुरती ठरू नये, तर गोवा राज्यातून जो अवैध मद्य साठा सिंधुदुर्गात व महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात नेला जातो, तो कायम स्वरूपी बंद करण्यात यावा, त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. महाराष्ट्राचा महसूल बुडवण्यासाठी गोवा राज्यातील दारू विक्रेते मदत करतात, त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी. तसेच एकाच गुन्ह्यात पुन्हा-पुन्हा मिळालेल्या आरोपीची मालमत्तेची चौकशी करून महाराष्ट्र शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडवला म्हणून त्यांच्यावर ईडी ची चौकशी लावावी, असे आमचे म्हणणे आहे.

उत्पादन शुल्क अधिकारी अशा पद्धतीने ज्या वेळी कारवाई करतील, त्यावेळी निश्चितच गोव्यातून होणारी अवैध मद्याची वाहतूक बंद होईल. फक्त कागदोपत्री दाखविण्यासाठी कागदी घोडे नाचवण्याला आमचा विरोध आहे. कागदावर फक्त सिंधुदूर्गात जाऊन कारवाई केली, असे दाखवायचे व धनिकांना पोसायचे. हा धंदा आता कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. असे आम्हाला वाटते. राज्याचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलच्या अग्रलेखांची दखल घेऊन सहाय्यक आयुक्त वाय. एम. पवार यांची याकामी नेमणूक करून जे धाडस दाखवले, त्या धाडसाचे आम्ही शंभर टक्के कौतुक करतो. व ही कारवाई अशीच पुढे सुरू राहील अशी अपेक्षा करून गोव्यातून होणारी अवैध मद्याची वाहतूक कायम स्वरूपी बंद होईल अशी आशा बाळगतो.

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*💥 प्रतिभा संपन्न कोकणच्या प्रत्येक हालचालींवर अतिसुक्ष्म नजर ठेवणारे कोकणातील सुपरफास्ट चॅनल….🔥*

🖥️ *कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज….💥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*♦न्यूज एडिटर : गुरुनाथ राऊळ*
*📱संपर्क : +919422686976*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!