सावंतवाडी दोडामार्ग मराठा समाज उत्कर्ष मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथराव परब यांना श्रद्धांजली!

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.०६: मराठा समाज उत्कर्ष मंडळ निर्माण करून कै. जगन्नाथ परब यांनी बहुजन समाजाच्या कल्याणासाठी उपक्रम राबविण्याचा संकल्प केला होता, तो संकल्प यापुढेही चालू ठेवण्यासाठी या मंडळाच्या वतीने प्रयत्न केले जातील आणि त्याला समाजातून सहकार्य मिळेल अशी ग्वाही श्रद्धांजली शोकसभेत वाहण्यात आली. सावंतवाडी दोडामार्ग मराठा समाज उत्कर्ष मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथराव परब यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांना आज श्रद्धांजली वाहण्यासाठी बॅरिस्टर नाथ पै सभागृहात सभा आयोजित केली होती.

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, सिंधुदुर्ग बँक संचालक विकास सावंत, भाजपा तालुका अध्यक्ष महेश धुरी, उत्कर्ष मंडळाचे दत्ताराम सदडेकर, सुहासिनी सदडेकर, अँड.संतोष सावंत, भूपेंद्र सावंत, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, साईप्रसाद हवालदार, नगरसेवक आनंद नेवगी, सत्यजित धारणकर, प्रथमेश तेली, सौ. भक्ती सावंत, पुंडलिक दळवी, सुधाकर राणे, यशवंत आमोणकर, उमेश पेडणेकर, दिलीप भाईप, केतन अजगावकर, आदी उपस्थित होते.

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली म्हणाले, समाजामध्ये लोककल्याणाचे उपक्रम हाती घेणारे अनेक मान्यवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात धडपड करत आहेत. त्या पैकी एक जगन्नाथराव परब होते. त्यांना अण्णा या नावाने लोक ओळखतात. त्यांच्या कामाचे त्यांनी उत्कर्ष मंडळाच्या माध्यमातून उत्कृष्ट संघटन कौशल्य दाखवले यापुढील काळात त्यांना त्यांच्या विचाराने संस्था जे काही ही कार्य करेल त्याचा उत्कर्ष साधण्यासाठी आम्ही सहकार्य करू असे म्हणाले.

यावेळी उत्कर्ष मंडळाचे सचिव अँड. संतोष सावंत यांनी जगन्नाथ परब यांच्या परिचय करून दिला. तसेच मराठा समाज उत्कर्ष मंडळाची स्थापना करून बहुजन समाजाला आर्थिक मदत आणि सहकार्य करण्यासाठी त्यांनी केलेल्या कामाचा धावता आढावा घेतला. यावेळी त्यांनी या पुढील काळामध्ये मराठा समाजाचे भवन किंवा मराठा समाजाचे  स्मारक उभारताना त्याला मराठा उत्कर्ष मंडळाचे नाव दिले जावे, अशी मागणी अँड. सावंत यांनी केली.

यावेळी जिल्हा बँक संचालक विकास सावंत म्हणाले, आपण जगन्नाथराव यांना माझ्या वडिलांच्या कारकिर्दी पासून ओळखतो, त्यांनी नक्कीच बहुजन समाजाचे हित डोळ्यासमोर ठेवून कार्य केलेले आहे. मात्र, २८ वर्षापूर्वी मी प्रथमच जिल्हा परिषद निवडणुकीत उभा होतो. त्यावेळी तेही अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले त्यांचे बंधु माझ्या प्रचारात होते आणि त्यांनीही दिलदारपणे निवडणूक लढवली. मात्र, त्यानंतरच्या काळात त्यांच्यात आणि आमच्यात कधी कटुता निर्माण होण्याचा प्रसंग आलेला नाही. अशा दिलदार माणसाने मराठा समाजाच्या उत्कर्षासाठी  मराठा उत्कर्ष मंडळ काढून बहुजन समाजाचे आधार देण्याच्या उद्देशाने केलेले कार्य लौकिक वाढवणारे असून पुढील काळात त्यांच्या नावाने किंवा मराठा समाज उत्कर्ष मंडळ उपक्रम घेईल त्याला आम्ही निश्चित सहकार्य देऊ असे त्यांनी सांगितले.

यावेळी मंडळाचे दत्ताराम सडेकर, सुहासिनी सडेकर, सत्यजित धारणकर, भूपेंद्र सावंत यांनी अण्णांच्या कार्याचा आढावा घेऊन  त्यांचे उद्दिष्ट मांडले. यापुढील काळात मंडळाच्या माध्यमातून जगन्नाथराव यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आम्ही उपक्रम घेत राहू त्याला सर्वांचे सहकार्य असावे असे देखील सुहासिनी सडेकर म्हणाल्या.

यावेळी सर्व उपस्थितांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

*_🔥फ्री होम डिलिव्हरी ती ही फक्त सावंतवाडी शहरापुरती मर्यादित..🔥_*

*🍝 शिवन्या फास्टफूड 🍜*
कोविड-19 च्या काळात आमच्या सर्व ग्राहकांसाठी सावंतवाडीत आम्ही पुन्हा एकदा सुरू करीत आहोत. *फ्री होम डिलिव्हरी* सुविधा आणि ती ही पूर्णपणे सुरक्षित..

🍢गोबी मंचुरी        ₹25/-
🥘फ्लॉवर चिल्ली   ₹40/-
🥟स्टीम मोमो        ₹20/-

*_🤷🏻‍♂️खायला येणार कुठे? त्यासाठी आमचा पत्ता आहे,_*
हॉटेल मँगो 1 समोर, सावंतवाडी..

*_🙋🏼‍♂️मग वाट कसली पाहताय! उचला फोन आणि करा कॉल.._*
*_📱9404931801_*
*_📱9146144203_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!