क्राइमशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या साठ्याची त्रयस्थ पंचामार्फत पडताळणी करावी..

▪️जप्त केलेला मुद्देमाल परस्पर विकला जात असल्याचा संशय..

▪️राज्य उत्पादन शुल्क‌ आयुक्तांकडे केली मागणी..

▪️पंधरा दिवसात कार्यवाही न केल्यास आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 संपादकीय : सीताराम गावडे

🎴सावंतवाडी,दि.३०: राज्य उत्पादन शुल्क यांच्या सिंधुदुर्ग कार्यालयाने गोवा बनावटी दारूच्या धाडी टाकून जमा केलेला मुद्देमाल पंचनाम्याप्रमाणे तेवढ्याच आहे की, त्यातला मुद्देमाल परस्पर विकला गेला. यासाठी २०१५ ते २०२० पर्यंतच्या मुद्देमालाची त्यावेळी झालेल्या पंचनाम्यानुसार तपासणी करण्यात यावी अशी मागणी आम्ही राज्याचे उत्पादन शुल्क आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. सदरच्या मागणीबाबत येत्या पंधरा दिवसात सकारात्मक निर्णय न झाल्यास आयुक्तांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग विभागाने आतापर्यंत परराज्यातून येणारा अवैध दारुचा साठा जप्त करून तो ज्या ठिकाणी गोडाउन मध्ये ठेवला आहे, तो जप्त केलेला साठा त्यावेळी केलेल्या पंचनाम्यानुसारच आहे का? की, त्या साठ्यातील मुद्देमाल गायब झाला. याची चौकशी होणे गरजेचे आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार गोवा बनावटीच्या दारूचा साठा हा परस्पर दोन नंबर विक्रेत्यांना विकला जात आहे. सदरचा साठा नष्ट करण्याचा आदेश न्यायालयातून दिला जातो. त्यावेळी आपलेच पंच घेऊन एका अज्ञात ठिकाणी जाऊन व्हिडिओ शूटिंग‌ तो मुद्देमाल नाष्ट केला जातो. मात्र, सदरच्या मुद्देमालाबाबत  न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत जप्त केलेला २५ टक्के सुद्धा गोडउन मध्ये शिल्लक राहत नाही. तो माल या खात्यातील अधिकारी संगनमताने परस्पर विकतात. अशी खात्रीशीर माहिती आहे.

म्हणून सदरच्या मालाचा तत्कालीन पंचनाम्यानुसार पंचनामा करण्यात यावा हा पंचनामा करताना सामाजिक संस्थेतील एक सदस्य, राजकीय एक सदस्य, पत्रकार,  एक सरकारी वकील, आरोग्य अधिकारी एक सदस्य अशी कमिटी गठित करण्यात यावी व त्या कमिटीच्या समक्ष सदरचा पंचनामा करून त्यावेळच्या पंचनाम्याला आताचा मुद्देमाल मिळता-जुळता आहे काय याची खात्री करावी, मुद्देमाल जुळत नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांना दोषी ठरवून त्यांना निलंबित करण्यात यावे व त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी अशी मागणी आम्ही आयुक्तांकडे केली आहे.

परराज्यातून येणारा कोट्यावधी रुपयांचा दारूचा साठा गेल्या पाच वर्षात उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी जप्त केला असेल शिवाय सिंधुदुर्गातील धाड सत्रातही गोवा बनावटीची दारू जप्त झाली असेल सदर दारुचा पंचनामा करून तो साठा ज्याठिकाणी ठेवला गेला आहे, त्या ठिकाणाहून त्या साठ्यातील दारू मुद्देमाल गायब झाला आहे, असे आमचे ठाम म्हणणे आहे. म्हणून याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. जेव्हा कुंपणच शेत खाते तेव्हा विश्वास कोणावर ठेवायचा अशी अवस्था या दारू बंदी उत्पादन शुल्क खात्याची झाली आहे. वास्तविक शासनाने आपल्या महसूल बुडू नये म्हणून राज्य उत्पादन शुल्क हे स्वतंत्र खाते निर्माण केले. या खात्याचे हे एकच काम असताना हे खाते मात्र, हप्ते  खाऊन निद्रिस्त झाले आहे. त्यामुळे या झोपी गेलेल्या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी ढोल वाजवून उपयोग नाही, तर त्यांच्या कानात गरम तेल ओतायला पाहिजे तरच ते जागे होतील. म्हणून शेवटचा उपाय म्हणून हा पर्याय आम्ही अवलंबला आहे.

याबाबत राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांनी ठोस कारवाई न केल्यास त्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा निर्धार आम्ही केला आहे. शासनाची करोडो रुपये फी भरून परवाना घेऊन दारू विक्रीची दुकाने चालवणारे मालक दिवसेंदिवस कंगाल होत चालले आहेत. तर गोव्याहून चोरटी दारू आणून सिंधुदुर्गात व सिंधुदुर्गाबाहेर विकणारे दलाल मात्र, करोडोपती झालेले आहेत. ही सर्व कृपा स्थानिक पोलिस व राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे या खात्यांच्या अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांची मालमत्ताही तपासण्यात यावी अशी मागणी आम्ही यानिमित्ताने केली आहे.

सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले, मालवण, देवगड, कणकवली, वैभववाडी याठिकाणी वेगवेगळे दारू तस्कर मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. सिंधुदुर्गात जवळपास जेवढी अधिकृत परवाना धारकांची संख्या आहे, तेवढ्या जवळ दोनशेच्या आसपास चोरटी दारू वाहतूक करणारे दलाल आहेत. त्यामुळे शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडविला जात आहे. एखाद्या दारू वाहतूक करणाऱ्याचा मुद्देमाल पकडल्यानंतर सदरची दारू त्यांनी कोठे घेतली त्याची चौकशी होणे गरजेचे असते. सदरची दारू विक्रेता ही दारु महाराष्ट्र नेणार हे माहिती असतानाही महाराष्ट्राचा महसूल घडविण्यास मदत करतो. म्हणून संबंधितावर सुध्दा कारवाई होणे गरजेचे असते. मात्र, हे सोपस्कार हेतुपुरस्कर टाळले जातात. एकाच गुन्ह्यात पुन्हा-पुन्हा सापडलेल्या आरोपीला तडीपार करण्याची तरतूद असतानाही आज पर्यंत एकाही गुन्हेगाराला तडीपार करण्यात आले नाही. ही वस्तुस्थिती आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल पकडूनही त्याच दिवशी आरोपीला जामीन मिळतो व तो पुन्हा दारू विक्री करायला मोकळा होतो. म्हणजे न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडली जात नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे एकंदरीत या खात्याचा कारभार ‘आंधळं दळतं, कुत्रं पीठ खातयं’ असा झाला असून या खात्यातील कर्मचारी पंच हे गब्बर झाले आहेत. तेच ही यंत्रणा चालवत असल्याचा आमचा संशय आहे. काही वेळा अधिकारी अनभिज्ञ असतीलही त्यांना अनभिज्ञ ठेवले गेले असेल मात्र, त्याला सर्वस्वी जबाबदार उत्पादन शुल्क खाते आहे. असा आमचा आरोप आहे. त्यामुळे ‘सुक्याबरोबर ओलेही जळते’ या म्हणीप्रमाणे एका कारकुनाने जरी चूक केली, तरी पूर्ण खातेच बदनाम होते. ही वस्तुस्थिती आहे.

आम्ही सरसकट सर्व अधिकारी हप्ते घेतात, असे म्हणणार नाही. मात्र, जोपर्यंत हप्तेखोर  अधिकारी कोण? हे सिद्ध होत नाही, तोपर्यंत सगळ्यांना एकाच तराजूत तोलले जाणार आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांनी या बाबतचा निर्णय घेतल्यावर ‘दूध का दूध, पानी का पानी’ होणार आहे.

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*💥 प्रतिभा संपन्न कोकणच्या प्रत्येक हालचालींवर अतिसुक्ष्म नजर ठेवणारे कोकणातील सुपरफास्ट चॅनल….🔥*

🖥️ *कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज….💥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*♦न्यूज एडिटर : गुरुनाथ राऊळ*
*📱संपर्क : +919422686976*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!