कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

धाकोरे ऐक्यवर्धक संघाने जपली सामाजिक बांधिलकी गुणवंतांचा केला सन्मान

धाकोरे ऐक्यवर्धक संघाने जपली सामाजिक बांधिलकी
गुणवंतांचा केला सन्मान

सावंतवाडी : तालुक्यातील धाकोरे गावातील धाकोरे ऐक्यवर्धक संघ मुंबई तर्फे इयत्ता दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी, विद्यार्थीनींचा भेटवस्तू देऊन गुणगौरव समारंभाचे तसेच भास्कर मुळीक यांच्याकडून रांगोळी, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. धाकोरे प्राथमिक शाळा येथे करण्यात आले. सदर प्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांना संघाचे माजी पदाधिकारी आणि सभासद तसेच उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
तसेच तीनही परिक्षांत अव्वल गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संघाचे सभासद तथा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गायक समीर चराटकर यांच्याकडून कै. लवू सखाराम चराटकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रत्येकी रु. १०००/- रोख पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर माजी पं. स. सदस्या मनीषा गोवेकर, सरपंच अजित नातू, उपसरपंच
बाबल गावकर , तसेच ग्रा.पं. सदस्य संध्या मुळीक, भारती मुळीक, सौ. पालयेकर, सौ. गवस, हरेश कोठावळे तसेच केंद्रप्रमुख म. ल. देसाई, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा रोहिणी मुळीक,
धाकोरे ऐक्यवर्धक संघ मुंबईचे
खजिनदार यशवंत तोरस्कर, संदीप मुळीक, नारायण सखाराम चराटकर, बाळा राळकर, अनिल गोवेकर , अंगणवाडी सेविका मनाली साटेलकर, ग्रा. पं. कर्मचारी बाबू साटेलकर आदी उपस्थित होते.
यावेळी पंचायत समितीच्या माजी सदस्या मनीषा गोवेकर यांनी धाकोरे ऐक्यवर्धक संघ, मुंबईने आपल्या गावाप्रती जोपासलेल्या सामाजिक दातृत्वाचे कौतुक केले. तसेच आजच्या मुलांना केवळ स्वातंत्र्य काळातील नेत्यांचे वेषभूषेबरोबर त्यांचे विचार व संस्कार करणे गरजेचे असल्याचे विचार व्यक्त करीत स्वांतत्र्यानंतर ७५ वर्षातील महत्वाच्या प्रवासाबद्दलचा मागोवामनीषा गोवेकर यांनी घेतला.
धाकोरे ऐक्यवर्धक संघ, मुंबई तसेच भास्कर मुळीक व शालेय व्यवस्थापन कमीटी यांनी जपलेल्या ग्राम विकासाचे कौतुक अनिल गोवेकर यांनी केले.
प्रास्ताविक मुख्याध्यापक दिलीप जाधव यांनी केले. आभार मंगेश सांगेलकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष नितीन मुळीक व शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.
दरम्यान सदर उपक्रमासाठी धाकोरे ऐक्यवर्धक संघ, मुंबई कार्यकारिणीचे
अध्यक्ष प्रभाकर तोरस्कर, सदस्य प्रदीप दळवी, बाबुराव नाईक, विकास परब, सुनील मुळीक,
सचिव आनंद पालयेकर, उपसचिव संदीप मुळीक, नारायण चराटकर, अरुण गवस, प्रकाश गवस,
संतोष मुळीक यांनी मौलिक सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!