सावंतवाडी तालुका मराठा समाजा तर्फे २०ऑगस्ट रोजी विनायक मेटे यांना वाहण्यात येणार श्रद्धांजली
सावंतवाडी तालुका मराठा समाजा तर्फे २०ऑगस्ट रोजी विनायक मेटे यांना वाहण्यात येणार श्रद्धांजली
मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे, उपाध्यक्ष लक्ष्मण नाईक, विकास सावंत, अर्चना घारे परब यांच्या उपस्थितीत झाली नियोजन बैठक
सावंतवाडी,दि.१६ ऑगस्ट (प्रतिनिधी)
सावंतवाडी मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाचे नेते विनायकराव मेटे यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम येत्या शनिवार दि.२० ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता आर पी डी हायस्कूल सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
शिवसंग्रामचे नेते मा. आम. विनायकराव मेटे यांचे अपघाती निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नियोजन बैठक सावंतवाडी मराठा समाज अध्यक्ष सिताराम गावडे यांच्या उपस्थित आर पी डी हायस्कूल येथे घेण्यात आली. यावेळी विकासभाई सावंत,सौ अर्चना घारे परब,लक्ष्मण नाईक, पुंडलिक दळवी, विलास जाधव, शिवप्रसाद देसाई ,विजय देसाई, ॲड संतोष सावंत सौ दर्शना बाबर देसाई,. प्रसाद दळवी ,अमोल दळवी, प्रशांत बिरोडकर,आनंद धोंड,दिगंबर नाईक,
आदी उपस्थित होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून विनायकराव मेटे यांनी जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत लढले. ते मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमला जात असताना अपघाती निधन झाले.तरी मराठा समाज बांधवांनी शनिवार दि २०ऑग्स्ट रोजी च्या श्रध्दांजली कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

