कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ सांगवे आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत सन २०२१-२०२२ वाफोली जि. प.शाळा नं.१ ची कु.संचीता कि.गवस हीचे घवघवीत यश

युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ सांगवे आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत सन २०२१-२०२२ वाफोली जि. प.शाळा नं.१ ची कु.संचीता कि.गवस हीचे घवघवीत यश

बांदा:प्रतिनिधी:शैलेश गवस

युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ सांगवे आयोजित सिंधुरत्न(STS) टॅलेंट सर्च परीक्षेत सन २०२१-२०२२ मध्ये वाफोली जि.प.शाळा नं.१ ने घवघवीत यश मिळविले असून परीक्षेस प्रविष्ट अनेक विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन केले आहे.या शाळेची गुणवंत विद्यार्थिनी कु.संचीता किशोर गवस वाफोली या विद्यार्थिनीने विशेष प्राविण्य मिळवत जिल्ह्यातून १० वा येण्याचा बहुमान मिळवला.आर.पी.डि.हायस्कूल येथे पार पडलेल्या बक्षिस वितरण सोहळ्यात कणकवली मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद सदस्या सौ.श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.यावेळी त्यांच्या सोबत मार्गदर्शक शिक्षिका सुजाता गवस मॅडम सह त्यांचे वडील नागेश शृंगारे उपस्थित होते.तर व्यासपीठावर आमदार नितेश राणे सह,युवा संदेश प्रतिष्ठान संस्थापक संदेश उर्फ गोट्या सावंत,शिक्षण प्रसारक मंडळ कार्याध्यक्ष विकास भाई सावंत,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत,माजी नगराध्यक्ष संजू परब,माजी नगरसेवक उदय नाईक,बांदा सरपंच अक्रम खान,माजी शिक्षण सभापती प्रमोद कामत,जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर,शिक्षक सुरेश जाधव सह अनेक मान्यवर उपस्थित होते.कु.संचिता किशोर गवस हिच्या यशाचे सर्व स्तरातून कौतुकासह तिला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!