कोरोना काळात फी साठी तगदा लावणाऱ्या खाजगी शैक्षणिक संस्थांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करा.
▪️’मनसे’चे तालुक्याच्या वतीने गट शिक्षणाधिकारी सौ. कल्पना बोडके यांना निवेदन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.०४: तालुक्यातील काही खाजगी शाळांकडून वसुली केला जाणाऱ्या फि संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुक्याच्या वतीने पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी सौ. कल्पना बोडके यांना निवेदन देण्यात आले.
गट शिक्षणाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात ‘मनसे’ने असे म्हटले की, करोना काळात गेले सात ते आठ महिने राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद आहेत. तसेच लोकांचे रोजगार देखील बुडाले आहेत. तसेच अवेळी पडलेल्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे शेतकरी देखील मेटाकुटीस आलेला आहे. अशा परिस्थितीत मागील काही दिवस खाजगी शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांच्या मागे फी साठी तकदा लावत आहेत. शैक्षणिक संस्थांची अव्वाच्या-सव्वा फी भरणे आर्थिक परिस्थितीमुळे पालकांना शक्य नाही. तसेच फी संदर्भात राज्य सरकारचे निर्देश आहेत.
तरी करोना काळात फी साठी तगदा लावणाऱ्या खाजगी शैक्षणिक संस्थांची तात्काळ चौकशी करण्यात यावी व या संस्थांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी विनंती मनसेच्या निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
यावेळी माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल केसरकर, तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, शहराध्यक्ष आशिष सुभेदार, कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, सचिव विठ्ठल गावडे, मनविसे तालुकाध्यक्ष ओमकार कुडतरकर, शुभम सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
_*😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे ‘सुर्या गॅस’..*_
*🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_
*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*
🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.
*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

