महाराष्ट्रात अधिकारी, कर्मचार्‍यांनी मराठीत संभाषण व लेखी व्यवहार करावे; ‘मनसे’चे उपविभागीय दंडाधिकारी यांना निवेदन

▪️मराठी येत नसलेल्या अधिकार्‍यांना मराठीचे धडे शिकवण्याचा ‘मनसे’चा उपक्रम पत्रकार दिनी जाहीर..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.०६: मराठी वृत्तपत्र दर्पणाची सुरुवात कै. बाळशास्त्री जांभेकर यांनी केली. तो दिवस मराठी पत्रकार दिन म्हणुन पाळला जातो. कै. बाळशास्त्री जांभेकर यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने ऋण व्यक्त करत आहोत. असे मनसे सावंतवाडी तालुक्याच्या वतीने उपविभागीय दंडाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्याची मराठी भाषा असावी व महाराष्ट्र राज्यात अधिकारी व कर्मचार्‍यांनी मराठी भाषेचा वापर करुन मराठीत पत्र व्यवहार आणि मराठीत संभाषण करावे. अधिकारी आणि कर्मचार्‍यांना मराठी येणे सक्तीचे आहे. अशाप्रकारे शासन परिपत्रक, शासननिर्णय केलेले असुन मराठी भाषा ही महाराष्ट्राची अभिजात भाषा अशावी असा ठरावही महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारला पाठवला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक बॅंकेचे अधिकारी व काही संस्थांचे अधिकारी हे परप्रांतातील असुन त्यांना मराठी बोलता येत नाही व ते हिंदी भाषेचा वापर करतात. कोकणातील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण जनतेला हिंदी समजत नसल्याने त्या अधिकार्‍यांना मनसे मार्फत मराठीचे धडे शिकवण्याचा उपक्रम आम्ही आजच्या पत्रकार दिनी जाहीर करत आहोत. ज्या कर्मचार्‍यांना मराठी येत नाही. त्यांना आम्ही पुढील महीन्याभरात मराठी शिकवण्यास तयार आहोत. याबाबत जिल्ह्यातील अग्रगण्य बॅंकेला (बॅंक ऑफ इंडिया) यांना व जिल्हाधिकार्‍यांना आपल्या माध्यमातुन कळवावे. अन्यथा मनसेच्या पद्धतीने त्यांना मराठी शिकवण्याचे काम मनसे स्टाईलने करु अन्यथा आपल्या स्थरावरुन अशा मराठी न येणार्‍या बॅंकेच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना जिल्हाबाहेर मोठ्या शहरामध्ये बदली करण्यात यावी. तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सिंधुदुर्ग जिल्ह्याची मागणी शासन निर्णयाप्रमाणे आपण वरिष्ठांमार्फत पूर्ण करावी अशी विनंती निवेदनात करण्यात आली.

यावेळी माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल केसरकर, शहराध्यक्ष आशिष सुभेदार, परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर, कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, उपशहर अध्यक्ष शुभम सावंत, सचिव आकाश परब, रोशन पवार आदी उपस्थित होते.

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

          🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!