कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

भट्टवाडी भागातील स्ट्रीट लाईट पुर्ववत

भट्टवाडी भागातील स्ट्रीट लाईट पुर्ववत

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला होता इशारा

सावंतवाडी शहरातील भट्टवाडी भागातील स्ट्रीट लाईट गेले दोन महिने सातत्याने रात्री नऊ ते पुढे सकाळ पर्यंत बंद होत होती याबाबतची तक्रार दोन दिवसापूर्वी वीज वितरण चे अधिकारी संदीप भुरे तसेच नगर परिषदेचे स्ट्रीट लाईट विभागाचे पर्यावेक्षक श्री प्रदीप सावळकर यांच्या जवळ करुन दोन दिवसात दोष शोधून न काढल्यास गंभीर आंदोलनाचा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला होता.सदरचा दोष शोधून विद्यूत पुरवठा पूर्ववत केला आहे.
, दोन्ही अधिकार्‍याने संयुक्तिक रित्या सदर दोष शोधून काढला, टीव्ही केबल,नेट केबल, यांचा स्पर्श विद्युत तारा ना होत असल्याने रोज रात्री लाईट जायची त्यामुळे रात्री जाणाऱ्या पादचाऱ्यांना तसेच पहाटे मॉर्निंग करणाऱ्या नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत होते सदर दोष शोधून काढून विद्यूत पुरवठा पूर्ववत केल्याबद्दल माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दोन्ही अधिकाऱ्यांची सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!