कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

न्हावेली गावात बी. एस. एन. एल. चे नेटवर्क गायब

न्हावेली गावात बी. एस. एन. एल. चे नेटवर्क गायब

मोबाईल सिमकार्ड ग्राहक
संपर्कहीन

बी. एस. एन. एल. अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर

सावंतवाडी (सुखदेव राऊळ)

बी. एस. एन. एल. चे नेटवर्क गायब झाल्याने न्हावेली गावातील मोबाईलधारक संपर्कहीन झाले आहेत. ही बाब लक्षात घेऊन न्हावेली गावातील ग्रामस्थांनी बी. एस.एन.एल.चे अधिकारी यांना जाब विचारला.
यावेळी न्हावेली ग्रामस्थ मोहन पालेकर, निलेश परब, संतोष फणसेकर,सुहास आचरेकर,प्रसाद गावडे,प्रशांत कांबळी व लक्ष्मण धाऊसकर यांनी, नेटवर्कची ही समस्या लवकरात लवकर दूर करा,अन्यथा गावातील लोकांना आणून आंदोलन करु असा, इशारा दिला आहे.
यावेळी उपस्थित अधिकारी व तंतज्ञ यांनी ज्या ज्या ठिकाणी झाला मोठा प्राॅब्लेम झाला असेल तो आम्ही लवकरात लवकर निट करु अशी हमी दिली आहे. तर तक्रारदार ग्रामस्थ यांनी , बी. एस. एन. एल, ची रेंज मिळत नसल्याने कोणाशी संपर्क साधणे किंवा रेंज नसल्याने कोणाचे आम्हांला काॅल येत नसल्याने जणू आम्ही संपर्कहीन झालो आहोत. यामुळे घरगुती गॅस संपणे, गावातील कोणी रुग्ण गंभीर होणे, कोणी नातेवाईक आजारी पडणे, मुंबई- ठाणे-पुणे- गोवा किंवा अन्य ठिकाणी नोकरी व्यवसाया निमित्ताने वास्तव्य करत असलेले कुटूंबिय-नातेवाईक यांच्याशी सुख-दुखा:च्या प्रसंगी संपर्क न होणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागते, अशी या तक्रारदार ग्रामस्थ यांनी तक्रार या निवेदनात मांडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!