सावंतवाडीसिंधुदुर्ग

कोलगांव प्रीमियर लीग २०२२,चा विजेता संघ प्रज्ञेश वॉरियर्स संघ,भटवाडी

 

कासारवाडी कला क्रीडा मंडळ, कोलगांव ने केले होते भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी, दि.०६:- कासारवाडी कला क्रीडा मंडळ, कोलगांव आयोजित कोलगांव प्रीमियर लीग २०२२ पर्व पहिले भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. ह्या स्पर्धेचा अंतिम सामना आज प्रज्ञेश वॉरियर्स भटवाडी विरुद्ध जय हनुमान कासारवाडी संघ यांच्या मध्ये झाला आणि अंतिम सामन्या मध्ये प्रज्ञेश वॉरियर्स भटवाडी संघाने विजय संपादन करत कासारवाडी कला क्रीडा मंडळ, कोलगांव आयोजित कोलगांव प्रीमियर लीग २०२२ च्या चषकावर आपले नाव कोरले.

 


प्रज्ञेश वॉरियर्स भटवाडी,विजयी संघाला चषक आणि ८८८८/- रुपये रोख रक्कम सरपंच संतोष राऊळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले . तसेच उपविजेता संघाला चषक आणि ५५५५/- रुपये रोख रक्कम बक्षीस देण्यात आले.यावेळी सरपंच संतोष राऊळ, ग्रा. पं सदस्य संदीप गवस,श्री. सुभेदार, रमेश कासार,पंच महेश डोंगरे, तुकाराम कासार, तुषार कासार, हेमंत कासार, कौस्तुभ कासार, प्रसाद पित्रे, स्वप्नील पित्रे, रामदास कासार, गौरव कासार,निखिल कांबळी हर्षद कासार,गौरव कुडाळकर,आशिष पित्रे, अथर्व पित्रे, प्रदीप कासार,महेश कुलकर्णी,गौरव आधारी, आबा म्हापसेकर, संदेश राऊळ, युवराज शिंदे, अभिजित बावकर, परेश बावकर, हर्षद कासार,मिलिंद कासार, पुरुषोत्तम कासार, प्रतीक पवार,लवलेश कांबळी, चेतन कासार, मंदार कासार,दयानंद कासार,रविंद्र कासार,विघ्नेश कासार, लक्ष्मण कासार, राजन कासार यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!