मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वरील टीका म्हणजे उंदराच्या टोपीची गोष्ट; दीपक केसरकर
▪️कोकणातील अपप्रवृत्ती नष्ट होईपर्यंत माझा लढा सुरूच..
▪️चांदा ते बांदा योजनेतील परत गेलेला नीधी, अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करणार..
▪️जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले नाही याचे शल्य कायम..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.३१: राजा भिकारी माझी टोपी घेतली या कथेतील उंदरा प्रमाणे नारायणाने यांची अवस्था झाली आहे टोपी दिली तर राजा घाबरला माझी टोपी दिली टोपी घेतली तर राजा भिकारी माझी टोपी घेतली असे उलट सुलट बोलणारा उंदीर कोण असा टोला माजी राज्यमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार दिपक केसरकर यांनी खासदार नारायण राणे यांच्या उद्धव ठाकरे वरील टीकेवर बोलताना लगावला आहे.
खासदार नारायण राणे हे सध्या वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांना काहीच काम नाही त्यामुळे ते तोल गेल्यासारखे वागत आहेत.जे डी पी चा फुलं फाॅर्म माहित नाही व अर्थ काय हे माहीत नसलेले जे डी पी वर बोलत आहेत कोणीतरी लिहून द्यावे व ते वाचून दाखवावे एवढेच काम आता नारायण राणे यांच्याकडे शिल्लक आहे.
शिवसेनेने त्यांना मुख्यमंत्री केले तेही ते विसरले त्यामुळे त्यांच्या टीकेकडे लक्ष देण्यासारखे काही नाही. असा टोला आमदार दिपक केसरकर यांनी लगावला. सिंधुदुर्गातील ,कोकणातली ,अपप्रवृत्ती जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत माझा लढा हा चालूच राहील त्यासाठी मी मंत्री, आमदार ,खासदार ,असायला हवे असं काहीच नाही ज्या ठिकाणी कोकणावर अन्याय होईल त्या ठिकाणी मी पेटून उठेल ज्या ठिकाणी चूक दिसेल त्या ठिकाणी भांडेन व सिंधुदुर्गाच्या हक्काचे जे काय आहे व परत गेलेले आहे ते मिळविलेल्या शिवाय शांत बसणार नाही मग तो लढा कोणाशीही उभारावा लागला तरी चालेल असा इशारा केसरकर यांनी यावेळी बोलताना दिला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शांत संयमी नेतृत्व आहे त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊनच आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केला व त्यांनीच मला मंत्री बनवले मला मंत्री बनवण्यामागे अन्य कोणाचा हात नाही कोणी फुकट च्या फुशारक्या मारू नयेत असा टोला यावेळी बोलताना स्वकीयांना लगावला.
काहीजण म्हणतात की आम्ही दीपक केसरकर यांना मंत्री केले व आम्हीच ते मंत्रिपद काढून घेतले मात्र वस्तुस्थिती मला मंत्री उद्धव ठाकरे यांनीच केले त्यामुळे मी त्यांच्यावर नाराज नाही व शिवसेना सोडून जाण्याचा प्रश्नच नाही मी शेवटपर्यंत शिवसेनेतच राहणार असे केसरकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले् चांदा ते बांदा योजनेतील परत गेलेला पैसा ,अर्धवट राहिलेली कामे, सिंधुदुर्गाच्या विकासासाठी लागणारा पैसा हा परत मिळविताना जे काय करावे लागेल ते मी करेन असे केसरकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.मला तीन वर्षे मंत्रीपद मिळाले असते तर माझी कामे पूर्ण करून मी ते चौथ्या वर्षी राजीनामा देऊन आमदार वैभव नाईक यांना मंत्री करा असे सांगितले असते व तसा शब्द आपण आमदार वैभव नाईक यांना दिला होता असे यावेळी बोलताना केसरकर म्हणाले.
मात्र जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले नाही याचे शल्य आपल्याला असल्याचे यावेळी केसरकर यांनी बोलून दाखविले.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_