रवी जाधव यांना इंदिरा गांधी संकुलातील दोन ओटे देणार;आम.दिपक केसरकर
प्रतिनिधी-प्रशांत मोरजकर
सावंतवाडी, दि.२६:- शहरातील बरेच दिवस वादाच्या भोवऱ्यात सापडलेले रवी जाधव ह्यांच्या स्टाँलसंदर्भात आजबैठक झाली.यामध्ये व्यवसायासाठी इंदिरा गांधी संकुलातील दोन ओटे तात्पुरत्या स्वरूपात रवी जाधव यांना देण्यात येणार असल्याची माहिती आज आमदार दिपक केसरकर यांनी दिली आहे. तहसीलदार कार्यालयात आज आमदार दिपक केसरकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे आणि मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या मध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच गणेशोत्सव, दिवाळी ह्या उत्सव काळात त्यांना बाहेर बसून व्यवसाय करण्याची मुभा देण्यात येणार आहे. तसेच येत्या आठवड्या भरात त्या ठिकाणी डिक्री जागेत असलेल्या इतर व्यापाऱ्यांवर देखील पालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे. या सर्व प्रक्रियेवर तहसीलदार राजाराम म्हात्रे यांचे लक्ष राहणार असल्याची माहिती त्यांनी बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली आहे.