सत्यप्रकाश साप्ताहिकाच्या माजी संपादिका तथा राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्या मीराताई जाधव यांचे निधन..
सावंतवाडी,दि.३१: ज्येष्ठ समाज सेविका व राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्या,तसेच साप्ताहिक सत्यप्रकाशच्या माजी संपादिका मीराताई जाधव (९३) यांचे शनिवारी सकाळी कोचरा येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. नाट्यकर्मी दिवंगत बाप्पा धारणकर यांच्या त्या कन्या तर कै.दिनकर धारणकर यांच्या भगिनी, सत्यप्रकाशचे संपादक हर्षवर्धन धारणकर तसेच सत्यजीत
धारणकर यांच्या त्या आत्या होत.

