मराठा समाजाचे आरक्षण कायदा रद्द होणे दुर्दैवी-सीताराम गावडे
मराठा समाज कोरोना काळानंतर व्यापक आंदोलन उभारणार
मराठा समाज शैक्षणिक व नोकरीधंद्यात खरोखरच मागासलेला असताना या समाजाच्या आशेचे किरण असलेले आरक्षण रद्द होने ही समाजाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे, लाखोचे मोर्चा काढूनही शासनाला जाग येत नसेल तर मराठा समाज वेगळ्या मार्गाचाही अवलंब करू शकतो, राज्य सरकार व केंद्र सरकारने यांनी याबाबत योग्य तोडगा काढून समन्वय साधून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टीने उचित पावले उचलावीत असे आवाहन मराठा समाजाचे सावंतवाडी अध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या मराठा समाज खरोखरच शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेला आ,हे शिक्षणात व नोकरीत विद्वत्ता असतानादेखील केवळ आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजाचे मुले मागे पडत आहेत त्यामुळे मराठा समाज आरक्षणाकडे डोळे लावून बसला होता ,आपल्यावर होणारा अन्याय सहन करण्यापलीकडे असल्याने समाजाने एकोपा दाखवत लाखोंचे मोर्चे काढले होते ,मात्र या सर्वांवर या निकालाने पाणी फिरले असे सीताराम गावडे यांनी म्हटले आहे.
मात्र या निकालाने मराठा समाज खचून न जाता अधिक जोमाने ताकदीने भविष्यात लढा उभा करेल व आपले आरक्षण मिळवेल असा विश्वास मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी व्यक्त केला आहे.