युवा रक्तदाता संघटनेच्या रक्तदान आंदोलनाला यश..
▪️युवकांच्या दोन्ही मागण्या शासनान मान्य केल्याने संघटनेने मानले आभार..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.३०: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदुर्गात व्हावे यासाठी, तसेच डॉ. अभिजित चितारी यांची बदली केल्यान उपजिल्हा रूग्णालयाला तातडीने फिजीशिअन द्यावा अथवा बदली रद्द करावी या मागणीसाठी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी रक्तदान आंदोलन छेडले होते. तर पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेत माजी आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर, संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी याबाबत मागणी केली होती. युवकांच्या या मागणीची तातडीन दखल घेत दोन्ही मागण्या शासनान मान्य केल्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करत याला मंत्रिमंडळाने आदेश दिल्याचा शासन आदेश सार्वजनिक आरोग्य विभागान काढला. तर डॉ. अभिजित चितारी यांना सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयात रुजू करत संघटनेच्या दोन्ही मागण्या मान्य केल्या. संपूर्ण महाराष्ट्रात कोठेही न झालेल्या अशा या विधायक रक्तदान आंदोलनामुळे दोन्ही प्रश्न मार्गी लागले. यासाठी संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदुर्गात व्हावे हि गेली अनेक वर्ष जनतेची मागणी होती. यासाठी १ ऑक्टोबर रोजी रक्तदान आंदोलन करत या मागण्या संघटनेच्यावतीने करण्यात आल्या होत्या.
या मागण्या मान्य केल्याबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, आरोग्य प्रशासनाचे संघटनेच्यावतीने त्यांनी आभार व्यक्त केले. तर रक्तपेढीतील कर्मचारी, डॉ. बागवान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कृती समितीचे अॅड. शामराव सावंत, डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, लक्ष्मण नाईक तसेच ज्या शेकडो युवकांनी रक्तदान करत आंदोलन केल. शासनाच नुकसान न करता मागण्या शासन दरबारी पोहचवल्या. तर आम्ही घेऊन नाही तर समाजाला देऊन आंदोलन केले असून यापुढेहि असच कार्य करत राहणार असल्याच मत देव्या सूर्याजी यांनी व्यक्त केल.
तर डॉ. चितारी यांची नियुक्ती जिल्हा रुग्णालयात झाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांचे हाल होत होते. अनेकांना गोवा बांबोळी, कोल्हापूर आदि ठिकाणी हालवाव लागत होत. तर वेळीच उपचार न मिळाल्याने काहींना जीव गमवावा लागला. मात्र, युवा रक्तदाता संघटनेच्या मागणीमुळे या समस्या दूर झाल्या अस मत उपजिल्हा रूग्णाल्याचे डॉ. मुरली चव्हाण यांनी व्यक्त करत संघटनेचे आभार मानले.
यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे संदीप निवळे, राघवेंद्र चितारी, अनिकेत पाटणकर, पार्थिल माठेकर, मेहर पडते, प्रथमेश प्रभु आदि उपस्थित होते.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

