राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या अवैध मद्य साठ्याची चौकशी होणे गरजेचे..

▪️उत्पादन शुल्क खात्यातील एकदम चलो आणि वस्त-मस्त नामक कर्मचारी करताहेत अधिकृत बार धारकांना त्रस्त..

▪️गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या गाडीचा पाठलाग करणाऱ्या उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांचा सारथी दोन नंबर धंद्याचा मोहरक्या..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 संपादकीय : सीताराम गावडे

🎴सावंतवाडी,दि.२९: गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गोवा बनावटीच्या दारूच्या गाडीचा दारूबंदी अधिक्षकांनी पाठलाग केला खरा; मात्र या गाडीचा पाठलाग केला, त्या गाडीचा चालक नासिर याने साहेबांच्या गाडीचे सारथ्य दोन नंबर धंद्यातील राकेश कुमार करत असल्याचा गौप्यस्फोट केल्याने दारूबंदी अधीक्षकांना ती दारु व अपघात प्रकरण पोलिसांकडे सोपवून परस्पर पळ काढावा  लागल्याचे वृत्त आहे.

वास्तविक ज्या ठिकाणाहून गोवा बनावटीची दारू महाराष्ट्रात आणली जाते, त्या मार्गावर तपासणी नाके असताना एवढ्या मोठ्या किंमतीच्या गोवा बनावटी दारूच्या गाड्या सुटतातच कशा? याचा अर्थ संबंधित तपासणी नाक्यावर तपासणी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना हप्ता दिला जातो व तो हप्ता मिळत असल्यानेच दारूची वाहतूक करणारे राजरोसपणे तपासणी नाक्यावरुन जाऊ शकतात. म्हणून संबंधित  नाक्यावरील कर्मचाऱ्यांविरुद्ध कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून बडतर्फ करण्यात यावे. तसेच महाराष्ट्र हद्दीत गोवा बनावटीची दारू नेली जाते हे माहिती असताना देखील संबंधित गोवा बनावटीची दारू विकणारा  मालक बेकायदा दारू होत वाहतुकीला प्रोत्साहन देऊन महाराष्ट्र शासनाचा महसूल बुडवत असेल तर त्या बार मालकावरही कारवाई होणे आवश्यक आहे.

राज्य उत्पादन दारूबंदी अधीक्षक यांनी ज्या गाडीचा पाठलाग केला त्या गाडीत ५० लाख रुपयांची गोवा बनावटीची  दारू होती व साहेबांच्या गाडीचे सारथ्य दारू वाहतूक करणारा  राकेश कुमार करत होता. हे जेव्हा लक्षात आले व दारू वाहतूक करणाऱ्या गाडीचा अपघात होऊन नासिर नामक चालकाचा हात मोडला गेला, तेव्हा हे प्रकरण परस्फर पोलिसांकडे सुपुर्द करून राज्य उत्पादन शुल्क अधिकारी नामानिराळे झालेत.

वास्तविक तपासणी नाक्यावर गाडी थांबविण्याचा अधिकार राज्य उत्पादन शुल्क अधिकार आहे. मात्र, गाडीचा पाठलाग करण्याचा अधिकार नाही. असा शासनाचा जीआर सांगतो. असे असताना सर्व नियमांचा भंग करून आपल्या गाडीचे सारथ्य दोन नंबर धंदा करणाऱ्या इसमाकडे देऊन दारूबंदी अध्यक्ष काय साध्य करु पाहत आहेत, याचा शोध घेणे गरजेचे आहे. या खात्यातील एकदम वस्त-मस्त नावाचे कर्मचारी एवढे मस्तावलेले आहेत की, संपूर्ण जिल्ह्यातील अधिकृत बार धारकांना त्रास देऊन मोठ्या रक्कमेची मागणी केली जाते. आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही, असे सांगून आधीच मर्कट असलेले व त्यात मदृय प्यायलेले हे कर्मचारी बार चालकांचे डोकेदुखी ठरले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्गातील या कार्यालयाची खातेनिहाय चौकशी होणे गरजेचे आहे. या खात्यातील अधिकाऱ्यांनी-कर्मचाऱ्यांनी आज पर्यंत कोण कोणते दिवे लावलेत? कुठे-कुठे कारवाई केली? त्या कारवाईत किती कोटीचा माल जप्त केला? जप्त केलेला माल जाग्यावर शिल्लक आहे की, तो परस्पर विकला गेला? याचाही शोध घेणे गरजेचे आहे. एकंदरीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात २८५ च्या आसपास अधिकृत परमिट धारक आहेत, तर १५० च्या आसपास बिअर शॉपी व ४० देशी दारूची दुकाने आहेत. या सरकार मान्य दुकानांना शासनाची लाखो रुपयांची फी भरावी लागते, तर बेकायदेशीर दारू वाहतूक करणारे कोट्यावधी रुपये कमवून लाखो रुपयांचा हप्ता अधिकाऱ्यांना देऊन गब्बर झाले आहेत. या सर्वांची चौकशी व्हावी अशी मागणी उत्पादन शुल्काचे आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे.

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*💥 प्रतिभा संपन्न कोकणच्या प्रत्येक हालचालींवर अतिसुक्ष्म नजर ठेवणारे कोकणातील सुपरफास्ट चॅनल….🔥*

🖥️ *कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज….💥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*♦न्यूज एडिटर : गुरुनाथ राऊळ*
*📱संपर्क : +919422686976*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!