सावंतवाडीतील संघटीत गुन्हेगारी मोडीत काढण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान..

▪️माणगाव-मोरे येथील प्रकाश मोर्ये यांच्या बाबतीत कोलगांव-कुणकेरी तीठा येथे घडलेली घटना विचार करायला लावणारी..

▪️पोलीस कायद्यातील पळवाटा काढून आरोपींना देताहेत संरक्षण..

▪️दारु जुगारातून मिळालेल्या अनैतीक संपत्तीतून चालली संघटीत गुन्हेगारी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 संपादकीय : सीताराम गावडे

🎴सावंतवाडी,दि.२०: हे बहुसंख्य, ते अल्पसंख्य असा कायदा लावून पोलिस पाठबळ मिळविणारे काही जातीय दंगलखोर सावंतवाडी शहरात व आसपास निर्माण झाले असून त्याचा फटका रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशाला, गाडी चालकांना बसत आहे. माणगाव मोरे येथील प्रकाश मोर्ये यांचा पोल्ट्री व्यवसाय आहे. ते आपली गाडी घेऊन सोमवारी रात्री सावंतवाडीतून मोरे येथे जाण्यास परतत असताना कोलगाव-कुणकेरी तिठ्यावर रस्त्याच्या मधोमध दोन युवकांची जोरदार धुमश्चक्री सुरू होती. त्यामुळे रस्त्यावर अडथळा निर्माण झाला होता. प्रकाश मोर्ये यांचे चालक रामचंद्र उर्फ प्रकाश गोसावी यांनी त्यांना बाजूला होण्यासाठी हाॅर्न वाजवीला. मात्र, ते बाजूला झाले नाहीत. तेव्हा गाडीची लाईट वर खाली केली, तेव्हा रागाने त्यातील दोन अल्पसंख्यांक युवक मद्यधुंद अवस्थेत त्यांच्या गाडीवर दगडफेक करू लागलेत. त्यांच्या गाडीच्या काचा फोडून टाकल्या, त्यांना गाडीतून बाहेर खेचून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पाठीवर, पोटावर दगड फेकून मारले. तसेच श्री. मोर्ये यांच्या गळ्यातील चैन हिसकावून घेतली. ही सर्व घटना आसपासचे ग्रामस्थ पाहत होते. मात्र, सोडविण्यासाठी कोणीही पुढे आले नाहीत.

कारण त्यांची ही संघटित गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दारू जुगार याच्या पैशातून अशाप्रकारची गुंडगिरी वाढत आहे. त्याचे समूळ उच्चाटन होणे गरजेचे असताना सावंतवाडी पोलीस यांना पाठीशी घालण्याचे काम करत आहेत.

प्रकाश मोर्ये व त्यांच्या चालकाने सावंतवाडी पोलीस स्थानकात येऊन आपली तक्रार दाखल केली. त्यानंतर त्या दोघांनाही सावंतवाडी पोलीस स्थानकात आणले गेले. त्यावेळी त्यांनी दारूच्या नशेत तेथील पोलिसांना शिव्यांची लाखोली वाहिली. मात्र, पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. उलट प्रकाश मोर्ये व त्यांचे सहकारी यांना तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असे सांगू लागले. या घटनेची माहिती माणगाव खोऱ्यात पसरताच प्रकाश मोर्ये यांचे मित्र मंडळ मोठ्या प्रमाणात सावंतवाडी शहरात दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी त्यांना शांत राहण्याच्या सूचना केल्या. मात्र, पोलीस स्थानकात धिंगाणा घालणाऱ्या त्या दोघांवर पोलीस कोणतीही कारवाई करू शकले नाहीत. यामागचे रहस्य मात्र उलघडले नाही.

प्रकाश मोर्ये यांच्या फिर्यादीवरून शाहिद शेख व एजाज शेख यांच्यावर रस्त्यात अडवून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, प्रकाश मोर्ये यांनी या झटापटीत त्यांनी आपली सोनसाखळी काढून घेतल्याची तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांनी त्या फिर्यादीत ती गहाळ झाल्याचे म्हटले; म्हणजेच पोलिस अशा प्रकारच्या आरोपींना कसे पाठीशी घालतात याचे मूर्तिमंत उदाहरण आहे.

एखादा मनुष्य दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी दुसऱ्यांना त्रास होईल असे कृत्य करत असेल तर त्याचा बंदोबस्त करणे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न म्हणून पोलिसांचे काम आहे. मात्र, अशा प्रवृत्तीला हिंदू-मुस्लीम वाद होईल असा रंग लावून दोन्ही पार्टीवर चॅप्टर केस करून तहसीलदार यांच्याकडे पाठवली जाते. याचा अर्थ तक्रारदाराला नाहक त्रास देण्याचे काम पोलिसांकडून केले जाते. सावंतवाडी शहरातच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनैतिक धंद्यामुळे मीळत असलेल्या झटपट पैशाच्या जीवावर ही संघटित गुन्हेगारी वाढीस लागली आहे. त्याचे समूळ उच्चाटन होणे गरजेचे असताना पोलीस प्रशासन दारू, जुगार, मटका, चालविणारे व्यक्ती अशा प्रकारचे कृत्य करत असतील व त्यांना पाठीशी घालत असतील तर यासारखे दुसरे दुर्दैव नाही. असेच खेदाने म्हणावे लागेल.

कायद्याच्या राज्यात कायद्याने काम चालण्यासाठी भांडावे लागते, झगडावे लागते, यासारखे दुसरे दुर्दैव ते कोणते? अशा प्रतिक्रिया या प्रकरणानंतर उमटत आहेत. सावंतवाडी पोलिसांनी शहरातील दारू, मटका, जुगार यांना अधिकृत लायसन्स बहाल केली आहेत. या पैशातून असे समाजकंटक समाजविघातक कृत्य करत आहेत. खरतर गुन्हेगाराला कोणताही जात नसते, धर्म नसतो, तो गुन्हेगार असतो. तो मग हिंदू असो! अगर कोणीही! कायदा तोच! मात्र, लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही असा अर्थ लोकशाहीचा तो आता संपुष्टात येत असल्याचे दिसत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्हे तर प्रत्येक खेडोपाडी अनैतिक पैशांच्या जीवावर चालू असलेली गुंडागिरी मोडीत काढणे जसे प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याचे काम आहे, तसे ते पोलिसांचे देखील आहे. अशा लोकांना पाठीशी घालून संघटित गुन्हेगारी वाढण्यास  पोलिस मदत तर करत नाही ना? असा प्रश्‍न आमचा आहे. याचे उत्तर शोधणे गरजेचे आहे. नाही तर भविष्यकाळ आपल्याला माफ करणार नाही.

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*♦न्यूज एडिटर : गुरुनाथ राऊळ*
*📱संपर्क : +919422686976*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!