कोरोना ग्रस्त रुग्णांना अळ्या असलेल्या निकृष्ट अन्नाचा पुरवठा; संबंधित संस्थेची पुन्हा चौकशी होणार
▪️कोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळणार्या संस्थेवर आणि अशा संस्थांना अनुमती देणार्या अधिकार्यांवर कठोर कारवाई करा; चैतन्य तागडे
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गुरुनाथ राऊळ
🎴सिंधुदुर्ग,दि.२९: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील मोशी येथील मागासवर्गीय वसतीगृहात अलगीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. या ठिकाणी रुग्णांना अन्नपदार्थ पुरवणार्या ‘टॅब किचन’ या संस्थेकडे अन्न पुरवठ्याचा परवाना नसतांनाही त्यांना अनुमती देण्यात आली; या संस्थेने पुरवलेल्या अन्नामध्ये चक्क अळ्या सापडल्या आहेत. असे असतांना अन्न आणि औषधी द्रव्ये प्रशासन विभागाने या संस्थेवर केवळ ११ हजार रुपयांचा दंड अन् या संस्थेचे कंत्राट रहित करण्याची कारवाई केली; प्रत्यक्षात कायद्यातील तरतुदीनुसार या संस्थेवर ५ लाख रुपयांचा दंड आणि संस्था चालकास ६ महिन्यांची कैद होणे अपेक्षित होते. त्यामुळे इतकी गंभीर घटना घडूनही इतकी सौम्य कारवाई का करण्यात आली, असा प्रश्न आरोग्य साहाय्य समितीचे श्री. चैतन्य तागडे यांनी या प्रसंगी उपस्थित केला आहे.
श्री. तागडे म्हणाले, मुळातच परवाना नसणार्या ‘टॅब किचन’ संस्थेला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कंत्राट कसे काय दिले? दोषी संस्थेवर नियमानुसार कारवाई का करण्यात आली नाही? अनुमती देणार्या संबंधित अधिकार्यांवर काय कारवाई करण्यात आली? असे प्रश्न उपस्थित करत, हे सर्व अनाकलनीय असून या सर्व प्रकारातून संस्थाचालक आणि पालिका प्रशासनातील अधिकारी यांचे काही साटेलोटे आहे का, अशी शंका व्यक्त केली. तरी हा प्रकार अत्यंत गंभीर असून कोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळण्यासारखा आहे. त्यामुळे अन्न पुरवठादार संस्था आणि महानगरपालिकेच्या संबंधित अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणीही आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने श्री. तागडे यांनी केली.
आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने काल २८ ऑक्टोबर दिवशी अन्न प्रशासन, पुणे परिमंडळ २ आणि ४ चे साहाय्यक आयुक्त बा.म. ठाकूर यांना तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रवण हर्डीकर यांच्या नावे असलेले निवेदन अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांना देण्यात आले.
या संदर्भात अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे साहाय्यक आयुक्त श्री. बा.म. ठाकूर यांनी चौकशी कायद्यानुसारच झाली आहे. तरीही या प्रकरणाची परत एकदा चौकशी करून कॅन्टीन मालक दोषी आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_