कोकणमहाराष्ट्रराजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे तर्फे पाणी गुणवत्ता व व्यवस्थापन यासाठी देण्यात येणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार निरवडे ग्रामपंचायतीला प्राप्त

🟥सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे तर्फे पाणी गुणवत्ता व व्यवस्थापन यासाठी देण्यात येणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार निरवडे ग्रामपंचायतीला प्राप्त

🟥सरपंच , उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व शिक्षक यांच्याकडून कौतुक व सत्कार

🎥 KOKAN LIVE BREAKING
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍🏻 प्रतिनिधी :सुखदेव राऊळ

🎴सावंतवाडी,२५:“कर्मचारी वर्गाने आपले काम चोखपणे बजावताना जास्तीत जास्त प्रामाणिकपणे काम केले.आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली.यामुळेच हे पारितोषिक निरवडे ग्रामपंचायतीला मिळाले आहे. या पुरस्काराचे तेच खरे पुरस्कार्थी आहेत.”,अशा शब्दांत निरवडे ग्रामपंचायतीमधील कर्मचारी वर्गाचे कौतुक करताना सरपंच हरी वारंग यांनी सर्व कर्मचाऱ्यांना शाबासकी दिली.
निरवडे ग्रामपंचायतीच्या पाणी गुणवत्ता व व्यवस्थापन या यंत्रणेला सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराचे स्वरुप 25 हजार रुपये रोख असे आहे. निरवडे ग्रामपंचायतीला हा पुरस्कार मिळवून देण्यासाठी मोलाची कामगिरी बजावलेल्या पाणी पुरवठा व्यवस्थापन कर्मचारी विलास गावडे, सतीश तोरसकर,शैलेश माळकर, मुक्ता मेस्त्री यांचा सरपंच हरी वारंग यांनी सत्कार केला.
या सत्कारावेळी ग्रामविस्तार अधिकारी मधुकर घाडी, उपसरपंच चंद्रकांत गावडे, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्या शिल्पा सावळ, सदस्य बाबल सावळ, निरवडेकर तसेच ग्रामस्थ, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.
या सत्काराबद्दल बोलताना पाणी पुरवठा व्यवस्थापन कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले. तसेच त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना,”आपल्या कामाची सरपंच हरी वारंग यांनी दखल घेतली.आमचे वेळोवेळी कौतुक केले. पाठिंबा दिला. आमचा उत्साह वाढवला. ” अशा शब्दांत आभार मानले. यावेळी उपस्थित सर्वानी या यशस्वी व कर्तबगार कर्मचाऱ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.

———————————————
*😊खुशखबर! खुशखबर! खुशखबर!😊*

▪️ गुंतवणुकीची सुवर्णसंधी ▪️

*⚫व्यवसाय वाढीसाठी गुंतवणूकदार 💵💴पाहिजेत🧑🏻‍💼👩🏻‍💼 लहान-मोठे सर्व प्रकारचे गुंतवणूकदार आमंत्रित*

🏠आमच्याकडे गुंतवणूक करा आणि दर महा योग्य मोबदला💵🎊🎉 मिळवा..
*किंवा*
एक वर्षानंतर भरगोस परतावा मिळवा..
सर्व व्यवहार कायदेशीर अँग्रिमेंटने होतील.

*Contact :-* Hindustan Capital Securities
Shope no.4,- 1Floor, Aditya Busines Center Building, Gandhi Chouk, Sawantwadi.

Mob: *9403367839 / 7083369430*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!