गांजा बाळगल्या प्रकरणी कोलगाव-चाफेआळी येथे एकाला अटक..
गांजा बाळगल्या प्रकरणी कोलगाव-चाफेआळी येथे एकाला अटक..
..तो मुळचा सातारा येथील रहिवासी
Kokan Live Breaking News
ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
सावंतवाडी,११ जुलै : गांजा बाळगल्या प्रकरणी कोलगाव-चाफेआळी येथे एकाला अटक करण्यात आली आहे. नारायण भगवान गिरी (३५), असे त्याचे नाव आहे. तो मुळचा सातारा येथील रहिवासी असून कोलगाव येथे भाड्याने राहत आहे. तेथे प्लास्टिकच्या पिशवीत ४३५ ग्रॅम १३ हजार रुपये किंमतीचा गांजा पोलीसांनी जप्त केला आहे. तो खुनाच्या गुन्ह्यात संशयीत म्हणून आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा गुन्हा अन्वेषण विभाग व सावंतवाडी पोलीस यांच्या संयुक्त पथकाने गोपनीय माहिती वरून संशयीत नारायण गिरी राहत असलेल्या कोलगाव येथे धाड टाकली आणि ताब्यात घेऊन चौकशी केली असता प्लास्टिकच्या पिशवीत गांजा आढळून आला.
अंमली पदार्थांच्या तस्करी बाबत वरचेवर तक्रारी होत आहेत या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारी घेतली आहे असे सांगितले.
दरम्यान मळगाव येथील एका विवाहित महिलेवर अत्याचार करून महीलेचा खून करून मृतदेह आंबोली घाटात टाकण्यात आला होता. या प्रकरणातील तो संशयित आहे. तसेच गोवा बनावट दारूची दोन प्रकरणे त्याच्या दाखल आहेत. गांजा वर कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा व सावंतवाडी पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली. त्याच्याकडून सुमारे तेरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद, प्रमोद काळसेकर,अनुपकुमार खंडे, महेंद्र घाग, प्रकाश कदम, प्रवीण वालावलकर, अनिल धुरी, रामचंद्र शेळके,आशिष गंगावणे, यश आरमारकर, अमित पालकर, अमित तेली आदींनी केली.
_________________________
*_कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..
_*
*_गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..
_*
* कोकण लाईव्ह ब्रेकिंग
*
* जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….
*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*संपर्क : +919405475712*
*कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप
*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
* कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_