बेकायदा गोवा बनावटीची दारु वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडीतील एक युवक ताब्यात
🟥बेकायदा गोवा बनावटीची दारु वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडीतील एक युवक ताब्यात
🟥…३ लाख ८१ हजार ६०० रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या दारुसाह एकूण तब्बल ७ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी,दि.२२: बेकायदा गोवा बनावटीची दारु वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी-वैश्यवाडा येथील नारायण संतोष वेंगुर्लेकर (वय २९) याला राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ३ लाख ८१ हजार ६०० रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या दारुसाह एकूण तब्बल ७ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज सकाळी शेर्ले येथे करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक कोल्हापूर यांना गोव्यातून शेर्ले येथील आडवाटेने मोटारीतून गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने शेर्ले गावात सापळा रचला होता. आज सकाळी दारूच्या बाटल्यांचे खोके घेऊन वाहतूक करणाऱ्या स्विफ्ट मोटारीला (एमएच ०४ जीई ९०९८) तपासणीसाठी थांबविण्यात आले. मोटारीच्या मागील डिकीत व सीटवर गोवा बनावटीच्या दारूचे बेकायदा खोके आढळले. पथकाने १८० मिली मापाच्या १४४० सिलबंद काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या तसेच ७५० मिली मापाच्या ३६० प्लास्टिक बाटल्या अशी एकूण ३ लाख ८१ हजार ६०० रुपये किमतीची दारू व ४ लाख १० हजार रुपयांची मोटार असा एकूण ७ लाख ९१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क खात्याचे कोल्हापूर विभागीय उपायुक्त यशवंत पवार यांच्या आदेशाने निरीक्षक पी आर पाटील, दुय्यम निरीक्षक आर जे येवलूजे, ए एस लोंढे, कॉनस्टेबल सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, दीपक कापसे यांच्या पाथकाने केली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक आर जे येवलूजे करत आहेत.
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

