अर्चना फाऊंडेशनच्या सौ. अर्चना घारी यांच्या मार्फत मळगांव मधील यशस्वी महिलांचा व समाजसेवकांचा सत्कार
*🟥अर्चना फाऊंडेशनच्या सौ. अर्चना घारी यांच्या मार्फत मळगांव मधील यशस्वी महिलांचा व समाजसेवकांचा सत्कार*
*🟥मळगांवच्या सरपंच सौ. स्नेहल जामदार, माजी सरपंच सौ.देवयानी दत्तात्रय राऊळ,सौ.अक्षया अर्जुन राऊळ, सौ.अर्चना चंद्रकांत जाधव, पोलीस पाटील सौ. रोशनी राजन जाधव तसेच चंद्रकांत भोजू जाधव यांचा समावेश*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*
*🎴 सावंतवाडी, दि.:२३ एप्रिल*
अर्चना फाउंडेशनच्या माध्यमातून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मोफत नेत्र दान, आरोग्य तपासणी, मोफत पुस्तक प्रदर्शन आदी विविध उपक्रम राबवताना अर्चना फाऊंडेशनच्या अर्चना घारे यांनी सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील यशस्वी महिलांना पुरस्कार व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्याची मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत अर्चना घारी यांनी “नारी शक्ती तुही कर्तबगार सरपंच, पोलीस पाटील” या कार्यक्रमातंर्गत गुरुवारी मळगांव मधील महिलांना सन्मानित केले. या सहीत हा सत्कार करण्याबरोबरच मळगांव मधील या यशस्वी महिलांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन त्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला. सौ. अर्चना घारी यांनी या महिलांना प्रोत्साहन मिळावे, त्यांना समाजात सक्रिय राहण्यासाठी बळ मिळावे, त्यांनी गावासाठी सक्रिय काम करावे,त्यांच्या कडून बचतगट व उद्योग निर्मिती व्हावी, महिलांना प्रत्येक कार्यात सहकार्य मिळावे व यासाठी प्रेरणा मिळावी या उद्देशांतर्गत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
या मोहिमेंतर्गत अर्चना घारे यांनी गुरुवारी मळगांवच्या सरपंच सौ. स्नेहल जामदार यांच्या सहित माजी सरपंच सौ.देवयानी दत्तात्रय राऊळ,सौ.अक्षया अर्जुन राऊळ, सौ.अर्चना चंद्रकांत जाधव, पोलीस पाटील सौ. रोशनी राजन जाधव तसेच नुकताच नवी दिल्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित चंद्रकांत भोजू जाधव यांचा सन्मान केला. अर्चना घारे यांनी माळीचेघर येथे माजी सरपंच सौ.देवयानी दत्तात्रय राऊळ व सौ.अक्षया अर्जुन राऊळ यांच्या केलेल्या सत्कारावेळी सिद्धेश तेंडोलकर,सौ.सिद्धी सिद्धेश तेंडोलकर, माजी सरपंच दत्तात्रय रामचंद्र राऊळ, मूकूंद राऊळ, सौ.माधवी मुकूंद राऊळ, हरिश्चंद्र राऊळ, रघुनाथ राऊळ, सुरेश राऊळ, भिकाजी राऊळ, अर्जुन राऊळ तसेच पत्रकार सुखदेव राऊळ व सावळवाडा चे ग्रामस्थ टिळक सावळ आदी उपस्थित होते. तर जाधववाडी येथे चंद्रकांत जाधव यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देऊन अर्चना घारे यांनी माजी तथा पहिल्या महिला सरपंच ठरलेल्या माजी सरपंच सौ. अर्चना चंद्रकांत जाधव, विद्यमान पोलीस पाटील सौ. रोशनी राजन जाधव यांच्या सहित चंद्रकांत जाधव यांच्या केलेल्या सत्कार प्रसंगी रमेश जाधव, देवू जाधव आदी उपस्थित होते.तर विद्यमान सरपंच सौ. स्नेहल जाधव यांच्या केलेल्या सत्कार प्रसंगी ग्रामस्थ मुकूंद राऊळ, माजी सरपंच सौ. देवयानी राऊळ, सौ. अक्षता राऊळ, उदय जामदार, सिद्धेश तेंडोलकर,सौ.सिद्धी तेंडोलकर व पत्रकार सुखदेव राऊळ आदी उपस्थित होते.
या सत्काराबद्वल आभार व्यक्त करताना सरपंच सौ. स्नेहल जामदार यांनी, ” सौ. अर्चना घारे यांनी आपल्या घरी प्रत्यक्ष येऊन केलेला सत्कार खरोखरच सर्वात मोठा सत्कार असल्याचे व मी या बाबतीत अपेक्षित नव्हते.हा सत्कार मला खरोखरच आनंदाचा क्षण आहे.हा सत्कार म्हणजे अभिमानाची बाब आहे.” असे मत व्यक्त केले. तर सौ. अर्चना जाधव यांनी “आपणांस मळगांव गावाने मागासवर्गीय प्रवर्गात सरपंच बनवून आपणास जी संधी दिली त्याचा मी योग्य वापर केला. यासाठी मला पती चंद्रकांत जाधव व संपूर्ण गावाचे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. या पदाचा यामुळे योग्य वापर करण्याची संधी मिळाली. यामुळे मी सुद्धा कोणत्याही कामात कसूर सोडली नाही. ” अशी भावना व्यक्त केली. पोलीस पाटील सौ. रोशनी जाधव यांनी सौ. अर्चना घारे येऊन केलेला हा सत्कार मला पुढील वाटचालीत प्रेरक ठरेल. ” अशी भावना व्यक्त केली. तर चंद्रकांत जाधव यांनी आपल्या सत्काराबद्दल बोलताना, ” आपल्या घरी येऊन झालेला हा पहिलाच सत्कार आहे. तो माझ्या इतर सत्कारांपेक्षा वेगळा व मोठा आहे. ” अशी भावना व्यक्त केली.
सो. अर्चना घारे या राष्ट्रवादी
प्रदेश कॉंग्रेसच्या पक्ष निरीक्षक पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत असून गाव कमिटी व बूथ कमिटी गठित करणे राष्ट्रवादीच्या कनेक्ट ऍपची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणे त्याचबरोबर प्रदेश कडून प्रशिक्षित व त्यांच्या बैठका आयोजित करून महिला युवती युवक विद्यार्थी यांचा पक्षात सहभागी करून घेण्याची जबाबदारी पार पाडत आहेत.
सौ. अर्चना घारे-परब या विधानसभा मतदार संघात जिल्ह्यातील सामाजिक कार्यात सक्रिय झाल्यापासून सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला याठिकाणी त्यांनी सामाजिक कार्याचा सपाटा लावला आहे. मूळ सावंतवाडीच्या माहेरवासिणी असलेल्या सौ. घारे-परब या स्थापत्य अभियंत्या आहेत. लग्नानंतर त्यांनी पुणे-मावळ ग्रामपंचायतीचे सरपंचपद भुषवित आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष पद, लोकनियुक्त महिला प्रतिनिधी संघ महाराष्ट्र राज्याचे सदस्यपद, पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसचे संघटक पद, तर इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव पुणे या संस्थेचे संचालक पद आदी विविध पदावर त्यांनी काम केले आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
🕉️ *||श्री||*
‼️ *आरोग्यम् धनसंपदा* ‼️
*🛐 आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी …..!
*🏬अँक्यू नेचर क्युअर पर्वरी – गोवा संचलीत…*
*‼️नँचरोपँथी व योगउपचार केंद्र‼️*
_जीवनरक्षा हॉस्पिटल मांजगाव,सावंतवाडी_
*💫तळहात / तळपाय, चेहरा ,जीभ ,नाडी ,राशी नुसार आजाराचे मुळ कारण शोधून उपचार वआहर मार्गदर्शन*
✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!* 🌴
♨ *आहार हेच तुमचे औषध…!* 🥣
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.🏃♂️🧎♂️
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटाचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या
💥 *सांध्याचे आजार* :-
गुडघा, टाच दुखी,शोल्डर पेन ,वाताचे आजार ,संधिवात/ आमवात
💥 *मणक्याचे विकार*
मान, पाठ ,कंबरदुखी ,सायटिका, स्पॉन्डिलाइटिस.
💥 *शारीरिक /मानसिक विकार:-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी ,मायग्रेन (अर्धशिशी )झोप न येणे.
💥 *पोटाचे आजार* : –
अपचन ,बद्धकोष्ठता, आम्लपित्त ,पोटदुखी, मुळव्याध ,कावीळ.
💥 *लहान मुलांचे आजार* :-
दमा ,ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे,स्मरणशक्ती वाढविणे
*💥स्त्रियांचे विकार /आजार* :-
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार , हार्मोन इन बॅलन्स ,रक्त कमी होणे ,शारीरिक /मानसिक अनेक समस्या.
✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध सुविधा मार्गदर्शन-*
☑योग /प्राणायाम🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉
👭 *कौटुंबिक वैयक्तिक मार्गदर्शन* —-
❇️ तणावमुक्त राहण्यासाठी
❇️ आत्मविश्वास वाढवणे
❇️ कामात प्रगती साधने
❇️ नातेसबंध जपणे
❇️ लहान मुलांच्या शारीरिक/ मानसिक समस्या
❇️ ऐकाचवेळीअनेक आजारावर मात करणे
❇️ निरोगी आनंदी जीवन जगणे
*टीप* :-
*नाव नोंदणी मेसेज पाढवून करणे अनिवार्य आहे.*
☎️ *मो.नं.-9404112034,/9403827261*
➖➖➖➖💯➖➖➖➖
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

