कोल्हापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हिंदूंच्या धार्मिक विधींची टिंगल केल्याप्रकरणी पोलीस तक्रार

🟥आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हिंदूंच्या धार्मिक विधींची टिंगल केल्याप्रकरणी पोलीस तक्रार

🟥कठोर कारवाईची हिंदु संघटनांची मागणी

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्ग,२२- राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी एका जाहीर कार्यक्रमात हिंदू धर्मातील कन्यादान विधी, त्यांतील मंत्र आणि पुरोहितवर्ग यांचा अपमान केला. तसेच उपस्थितांना ‘या विधींच्या माध्यमातून बहुजन समाजाला फसवले जात आहे’ असे वक्तव्यही केले. त्यांनी या भाषणातून एका समाज घटकाच्या विरोधात जातीय तेढ निर्माण होईल, अशी भाषा वापरली आहे. दुदैवाने त्यांच्या समोर आणि व्यासपिठावर बसलेले बहुतांश लोक हे हिंदूच होते, तरी त्यांच्या या जात्यंध विधानाला सर्वजण हसून प्रतिसाद देत होते. एकीकडे भोंग्यांच्या विषयावर मुसलमान समाजाच्या भावना दुखावतात, म्हणून त्याला विरोध करायचा आणि दुसरीकडे हिंदूंच्या धार्मिक विधींची टिंगल करत स्वतःच हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवायच्या, यातून अमोल मिटकरी यांना कोणत्या ‘वोट बँके’ची चिंता आहे आणि कोणत्या ‘वोट बँके’विषयी द्वेष आहे, हे स्पष्ट दिसून येते. कन्यादान विधीचा मंत्र म्हणत जी टिंगल अमोल मिटकरींनी केली, तशी ‘अजान’ची टिंगल करण्याची हिंमत मिटकरींमध्ये आहे का ? असा सवाल समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने श्री. सुनील घनवट यांनी केला आहे.

कोल्हापूर येथे गांधीनगर पोलीस ठाण्यात समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आमदार अमोल मिटकरी यांच्याविरोधात 21 एप्रिल या दिवशी धर्मप्रेमी श्री. विक्रम चौगुले आणि श्री. अजित पाटील यांनी तक्रार दाखल केली आहे. या वेळी सर्वश्री राजू यादव, विराग करी, प्रकाश मुदुगडे, अनिल दळवी, श्रीकांत शिंदे, अजित(अप्पा) पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. निवास यमगर, ग्रामपंचायत सदस्य श्री. रमेश वाईंगडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि बाबासाहेब श्री. भोपळे उपस्थित होते. कोणीही उठावे आणि हिंदु धर्मातील धार्मिक विधींची थट्टा करावी, हे आता सहन केले जाणार नाही. या विरोधात सनदशीर मार्गाने विरोध करत आंदोलन करण्यात येईल. या कार्यक्रमाच्या वेळी व्यासपिठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री श्री. जयंत पाटील आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री श्री. धनंजय मुंडे यांनीही या जात्यंध आणि हिंदु धर्मविरोधी टिंगल करण्याला जोरजोरात हसत दाद दिली. राज्याचे सामाजिक न्याय मंत्रीच जर दोन समाजात तेढ निर्माण करणार्‍यांना साथ देत असतील, तर राज्यात सामाजिक न्याय टिकून राहिल का, याबाबत शंका निर्माण होते. या घटनेनंतर राज्यभरातून टिका झाल्यावर जयंत पाटील यांनी ‘मी त्या विधानांविषयी दिलगिरी व्यक्त करतो’, असे विधान केले आहे, तसेच धनंजय मुंडे यांनी ‘अमोल मिटकरी जे बोलले ते वैयक्तिक बोललो. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा अजिबात हेतू नव्हता’, असे सांगून या प्रकरणी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे, तर आमदार मिटकरी यांनी ‘वाचा मौनस्य श्रेष्ठम्’, असे ट्विट केले आहे. वास्तविक अशा प्रकारची वरवरची क्षमायाचना अपेक्षित नसून असे प्रकार राजकीय पक्षातील लोकांकडून वारंवार का होतात ? याचा विचार करण्याची आवश्यक आहे. त्याचप्रकारे स्वत: केलेल्या वक्तव्यावर क्षमा न मागता संस्कृत श्‍लोकांचा आधार घेऊन मिटकरी हे अद्याही क्षमा मागण्यास सिद्ध नाहीत, असेच म्हणावे लागेल. तरी समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी आमदार अमोल मिटकरी यांनी हिंदु समाजाची जाहीर क्षमायाचना करावी, अशी मागणी केली आहे.

———————————————
*लक्ष पुर्वक वाचा आणि देशसेवक व्हा*

*सैन्यात भरती होण्याची सुवर्ण संधी*

*परम वीर डिफेन्स अ‍ॅस्पिरंट्स अकादमी/Param Veer Defence Aspirants Academy, Belgaum* ही एक निवासी अकादमी/कोचिंग सेंटर आहे. ही अकादमी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, पॅरा मिलिटरी फोर्सेसमध्ये सैनिक आणि डिफेन्स सिव्हिलियन म्हणून सामील होऊ इच्छिणाऱ्या शारीरिक आणि शैक्षणिक प्रशिक्षण देते.
*Academy Registration No: DRBG/SOR/1390/2021-2022*

*100% निकालाभिमुख* प्रशिक्षणाची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वोत्कृष्ट शिक्षकांसह अकादमीमध्ये शिक्षक म्हणून सर्व प्रयत्न केले आहेत.

*आम्ही पुरवत असलेल्या सुविधा*
⚜️योग आणि ध्यान.
⚜️शारीरिक प्रशिक्षण.
⚜️नाश्ता, ग्रीन टी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण.
⚜️ शैक्षणिक प्रशिक्षण – बेळगावमधील सर्वोत्तम शिक्षकांकडून गणित, विज्ञान, इंग्रजी, GK, तर्कशास्त्र इ.
⚜️ नियमित चाचण्या/परीक्षा.
⚜️ संध्याकाळचे व्यायाम/खेळ.
⚜️ आवश्यक असल्यास वैयक्तिक कोचिंग / समुपदेशन.
⚜️ बंक बेड.
⚜️ ट्रॅकसूट, टीशर्ट आणि शॉर्ट्स दिले जातील.
⚜️ मोफत WiFi.

*25% discount for admissions before 30 April 2022*

अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करा :

*PRASAD SAWANT*
*7204574369*
*9036230469* (WhatsApp)
Facebook : https://www.facebook.com/paramveeraspirants/
Location : https://goo.gl/maps/iu1Gt62vgrEm1Hqs6
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!