बोगस कुळ दाखवून जमीन हडप करण्याचे प्रकार कुडाळ तालुक्यातही
*🟥बोगस कुळ दाखवून जमीन हडप करण्याचे प्रकार कुडाळ तालुक्यातही*
*🟥महसूल विभागाच्या भ्रष्ट कारभासंदर्भात सावंतवाडी सह कुडाळ तालुक्यातील देखील “त्या” साशंकित “कुळांची” सखोल चौकशी व्हावी* *
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴 सिंधुदुर्ग, दि.:१४ एप्रिल*
सावंतवाडी तहसील यंत्रणेतील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश समोर आल्यानंतर कुडाळ तालुक्यात देखील अशाच प्रकारे बेवारस “कुळांची” बोगस प्रकरणे 2016 नंतर घडल्याची माहिती समोर आली आहे.मनसेने या
संदर्भात आक्रमक पवित्रा घेतल्याने जिल्ह्यातील नागरिक मनसेकडे अशा वादग्रस्त प्रकरणांबाबत कागदपत्रांनिशी माहिती देऊन संपर्क करत आहेत. कुडाळ तालुक्यात देखील अशी प्रकरणे समोर येत असल्याने अशा बेवारस “कुळांच्या” फसवणुकीचे बळी ठरलेल्या शेतकऱ्यांनी मनसेकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे. जिल्ह्याबाहेरील महसूल कर्मचारी ह्या रॅकेट मध्ये मोठ्या प्रमाणात सामील असल्याची चर्चा कानावर येत असून गरिबांच्या टाळूवरील लोणी खाणारे ह्यातील जिल्ह्यातील “झारीतले शुक्राचार्य” देखील समोर येणार आहेत. प्रांत/तहसील कार्यालय आवारातील सीसीटीव्ही दिशाहीन करून डंपर कारवाईविना सोडणे,वाळू/चिरे/खडी तस्करांकडून दरमहा “मलई” गोळा करणे,महसूल कडील दावे मॅनेज करणे असे प्रकार 2016 नंतरच वाढीस लागले असून जिल्हाबाहेरील महसूल कर्मचारी हे रॅकेट चालवत असून संपूर्ण यंत्रणाच भ्रष्टाचाराने पोखरली गेली आहे की काय असे चित्र निर्माण झाले आहे. कुडाळ तालुक्यातील “त्या” सर्व संशयित प्रकरणांची उच्चतरीय चौकशी व्हावी अशी मागणी मनसेच्यावतीने राज्याच्या महसूल मंत्र्याकडे पुराव्यानिशी करणार असून “ह्या” सर्व साशंकित प्रकारणात बोगस कुळ नोंदीने हातची जमीन गमावून भ्रष्टाचाराचे बळी ठरलेल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना मनसे नक्कीच न्याय मिळवून देईल अशी ग्वाही मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*लक्ष पुर्वक वाचा आणि देशसेवक व्हा*
*सैन्यात भरती होण्याची सुवर्ण संधी*
*परम वीर डिफेन्स अॅस्पिरंट्स अकादमी/Param Veer Defence Aspirants Academy, Belgaum* ही एक निवासी अकादमी/कोचिंग सेंटर आहे. ही अकादमी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, पॅरा मिलिटरी फोर्सेसमध्ये सैनिक आणि डिफेन्स सिव्हिलियन म्हणून सामील होऊ इच्छिणाऱ्या शारीरिक आणि शैक्षणिक प्रशिक्षण देते.
*Academy Registration No: DRBG/SOR/1390/2021-2022*
*100% निकालाभिमुख* प्रशिक्षणाची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वोत्कृष्ट शिक्षकांसह अकादमीमध्ये शिक्षक म्हणून सर्व प्रयत्न केले आहेत.
*आम्ही पुरवत असलेल्या सुविधा*
⚜️योग आणि ध्यान.
⚜️शारीरिक प्रशिक्षण.
⚜️नाश्ता, ग्रीन टी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण.
⚜️ शैक्षणिक प्रशिक्षण – बेळगावमधील सर्वोत्तम शिक्षकांकडून गणित, विज्ञान, इंग्रजी, GK, तर्कशास्त्र इ.
⚜️ नियमित चाचण्या/परीक्षा.
⚜️ संध्याकाळचे व्यायाम/खेळ.
⚜️ आवश्यक असल्यास वैयक्तिक कोचिंग / समुपदेशन.
⚜️ बंक बेड.
⚜️ ट्रॅकसूट, टीशर्ट आणि शॉर्ट्स दिले जातील.
⚜️ मोफत WiFi.
*25% discount for admissions before 30 April 2022*
अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करा :
*PRASAD SAWANT*
*7204574369*
*9036230469* (WhatsApp)
Facebook : https://www.facebook.com/paramveeraspirants/
Location : https://goo.gl/maps/iu1Gt62vgrEm1Hqs6
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

