द कॉर्बेट फाउण्डेशन’ आणि ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ यांच्या सहयोगाने व देवसू प्राथमिक शाळेच्या सहकार्याने देवसू गावातील शाळा परिसरात तज्ञ स्वच्छता मोहीम आली राबविण्यात
*🟥द कॉर्बेट फाउण्डेशन’ आणि ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ यांच्या सहयोगाने व देवसू प्राथमिक शाळेच्या सहकार्याने देवसू गावातील शाळा परिसरात तज्ञ स्वच्छता मोहीम आली राबविण्यात*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.:१४ एप्रिल*
‘द कॉर्बेट फाउण्डेशन’ आणि ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ यांच्या सहयोगाने आणि देवसू गावातील प्राथमिक शाळेच्या सहकार्याने देवसू गावात, प्रामुख्याने शाळा परिसरात तज्ञ स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. ह्या मोहिमेत ‘द कॉर्बेट फाउण्डेशन’सह शाळेच्या मुख्याध्यापिका आणि इतर सर्व शिक्षिकांसह विद्यार्थी उत्साहाने सहभागी झालेहोते.
मोहिमेच्या सुरुवातीला ‘द कॉर्बेट फाउण्डेशन’च्या वतीने विद्यार्थ्यांना परिसरातील स्वच्छतेचे महत्त्व समजावून देण्यात आले. प्लास्टिकचा अमर्याद वापर व त्याचे अयोग्य व्यवस्थापन हे आपल्याला किती घातक ठरू शकते याची माहिती दिली. आपल्या परिसरात पर्यावरणास घातक प्लास्टिकचा, काचेचा व इतर अजैविक कचरा फेकला जाणार नाही, ह्याची जबाबदारी लहानग्या विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या पालकांची किंबहुना गावातल्या प्रत्येक सुजाण नागरिकाची असल्याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले. प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी केलेल्या श्रमदानातून ही मोहीम यशस्वीरित्या पार पडली. सकाळी 8.30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत राबवण्यात आलेल्या मोहिमेत अवघ्या ३ ते ४ तासांत शाळा परिसरातून जवळपास २० पोती कचरा गोळा करण्यात आला. त्यामध्ये प्लास्टिकचा कचरा, काचेच्या बाटल्या आणि इतर अजैविक व पर्यावरणास घातक कचरा जमा झाला. गोळा केलेला सर्व कचरा योग्यरित्या विल्हेवाट लावण्यासाठी सावंतवाडी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प केंद्राकडे जमा करण्यात आला.
यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात ‘द कॉर्बेट फाउण्डेशन’ने चौकुळ ग्रामपंचायतींतर्गत गाव-वाड्यांमध्ये महिला बचत गटांच्या मदतीने स्वच्छता मोहीम राबवली होती. अशा मोहिमांचे वेळोवेळी आयोजन करण्यात येईल. या कार्यात गावातील मंडळींचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि अधिकाधिक सक्रीय सहकार्य अपेक्षित आहे. तेव्हा, ‘द कॉर्बेट फाउण्डेशन’च्या आजवरच्या उपक्रमांना आपण जसा भरभरून प्रतिसाद दिला तसाच तो येत्या काळातही असावा, असे आवाहन करण्यात आले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*_🚩यंदाचा गुढीपाडवा आमच्याकडच्या नवीन वस्तू खरेदी करून गुढीपाडवा साजरा करा ….!!!_*
*💫बिजली इलेक्ट्रॉनिक्स & अँप्लिअन्सस 🎁💥*
शेवटचे काहीच दिवस शिल्लक
*👉LED TV च्या खरेदीवर मिळवा 4.1 Home Theater फ्री*
*👉जुना चालू किंवा बंद TV घेऊन या आणि मिळवा 5000/- ते 10000/- पर्यंत सूट*
*👉फ्रीजवर कूलर फ्री*
*👉जुना कोणताही चालू किंवा बंद फ्रीज घेऊन या आणि मिळवा 5000/- ते 7000/- सूट*
*👉AC च्या खरेदीवर 30% पर्यंत सूट*
*Bajaj Finance सुविधा ते सुद्धा “0” टक्के व्याजदरात….*
(फक्त पॅनकार्ड,आधारकार्ड आणि राष्ट्रीय बँकेचे पासबुक वर)
*आमचा पत्ता व संपर्क:-*
Bijli Electronics & Appliances,
मेन रोड हॉटेल मँगोसमोर
बाजारपेठ सावंतवाडी.
मो. 9422055122
8983805122
*अटी व शर्ती लागू*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

