राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचा सावंतवाडीत निषेध
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचा सावंतवाडीत पदाधिकारी-कार्यकर्त्यांकडून माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली जोरदार निषेध करण्यात आला. यावेळी हल्ला करणाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर हा हल्ला विरोधकांनीच घडवून आणला, असा आरोप करत या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपस्थितांनी केली आहे.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व व्यापार विभाग हिदयतुल्ला खान, तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल, तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तेकर राजगुरू, तालुका अध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग जावेद शेख, अर्षद बेग, तालुका उपाध्यक्ष उद्योग व व्यापार विभाग याकुब शेख, महिला जिल्हा अध्यक्ष सौ. रेवती राणे, महिला तालुकाध्यक्ष सौ. रिद्धी परब, राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष सौ. सावली पाटकर, काशिनाथ दुभाषी, राकेश नेवगी, कौसतुभ नाईक, किरण सावंत, निलेश म्हाडगुत, महादेव नाईक, महिला सरचिटणीस सौ. रंजना निर्मळ, माजी सभापती आर. के. सावंत, मनोज वाघमोरे, जिल्हाध्यक्ष व्ही. जे. एन. टि. अशोक पवार, तालुकाध्यक्ष पदवीधर संघ प्रसाद दळवी, संदीप राणे, शफीक खान, असिफ ख्वाजा, जहिरा ख्वाजा आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना श्री. भोसले म्हणाले, घडलेला प्रकार हा निंदनीय, निषेधार्थ आहे. देशाचे नेते श्री.शरद पवार यांनी नेहमीच कामगारांबाबत सहानुभूती दाखवली आहे. एसटी कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला, सहानुभूती दाखवली आहे त्यामुळे सिल्व्हर ओक वर हल्ला करणे चुकीचे आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या निकालानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला होता.ते कामावर हजर होण्याची तयारी करत होते. मात्र काल त्यांना भडकवून श्री.पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला घडवून आणण्यात आला. या प्रकारामागे नक्कीच विरोधकांचा हात आहे. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
याप्रसंगी बोलताना श्री. पुंडलिक दळवी म्हणाले, पक्षाध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या घरावरील हल्ल्यामागे दुसऱ्याचाच मेंदू आहे. त्यामुळे त्या मेंदूचा शोध घेण्यात यावा. तसेच अशाप्रकारे एसटी कर्मचाऱ्यांना भडकून विरोधक घाणेरडे राजकारण करत आहेत. त्यामुळे हे कृत्य निंदनीय आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी. राज्य शासनाने सखोल चौकशी करून कारवाई करावी.